Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Madras sage Vijayanand.

#821

Yogesh Joshi
Member

Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Madras sage Vijayanand.

हरी ओम
श्री साई सचचरित (Saisachcharit ) मध्ये भगवान शिवाचा (Lord Shiv) उल्लेख चटकन आठवतो तो लाडका साई भक्त श्री मेघाच्या(Megha) संदर्भात. त्याशिवाय हा संदर्भ येतो अध्याय ३१ मध्ये……ज्यात विजयानंद(Vijayanand) नावाचा एक सन्यासी मद्रासहून(Madras) मानस सरोवराकडे जाण्यासाठी निघालेला असतो. हिंदू मान्यतेनुसार कैलास पर्वतावरील मानस सरोवराला श्री शंकर आणि पार्वतीचे निवासस्थान समजले जाते. ह्याच अध्यायामध्ये दरवेशी जे वन्य क्रूर प्राण्यांचे खेळ करून स्वत:ची उपजीविका करतात त्यांचे शिर्डीत आगमन होते. त्यांच्यासोबत असलेला वाघ जो जर्जर झालेला असतो त्याचे देहावसान झाल्यानंतर साईनाथ त्यास शंकराच्या देवळातील नंदिजवळ पुरण्यास सांगतात. ह्या अध्यातील सदर घटनेचे महत्व श्री हेमाडपंत अधोरेखित करतात कारण ह्या व्याघ्र घटनेनंतर सातच दिवसांनी श्री साईनाथांनी सुद्धा देह ठेवला होता. श्री राम.