Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva

#812

shantanu natu
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरी ओम
सर्वप्रथम मेघा ह्या भक्ताच्या एका छोट्याश्या कथेचा reference मला द्यावासा वाटतो :
” जो पर्यंत मेघा शिर्डीत होता तेव्हा आधी सर्व ग्राम देवतांना पुजून मग दुपारी मशिदीत आरतीला जात असे.
एके दिवशी हा नित्यक्रम चुकला कारण खंडोबा मंदिराचे दारच उघडले नाही. जेव्हा मेघा साई बाबांकडे जातो तेव्हा बाबा स्वत: हून मेघाला खंडोबाच्या देवळात जाऊन पूजा करून यायला सांगतात”
ह्या कथेमध्ये मेघा चा नित्यक्रम बाबा पूर्ण करून घेतात,

मला आठवतं आहे कि बापू पण एकदा प्रवचनात म्हणाले होते कि आपण आपल्या उपसानांचा नित्यक्रम कधीही चुकवू नये,
आपण नित्य नेमाने जे स्तोत्र म्हणतो, जी उपासना करतो, ती उपासना रोजच्या रोज केल्याने त्याचा effect आणि त्याचा आपल्यावरचा प्रभाव हळू हळू तयार होत असतो,

आपण तो नित्य क्रम जर एखादे दिवशी चुकवला, तर त्या उपासनेचा तो प्रभाव क्षीण होतो किंवा नाहीसा होतो .
साई चरित्रामध्ये आपण बघतो कि साई बाबा मेघा सारख्या चांगल्या भक्ताचा नित्य नेम चुकायला देत नाहीत.
मेघाच्या गोष्टीमधून व परमपूज्य बापूंच्या शिकवणीमधून आपण ह्यातून हेच शिकायला हवे कि जी उपासना आपण करत आहोत किंवा आपल्याला जी उपासना दादांनी दिली आहे त्याचा नित्य (रोजचा) क्रम आपण चुकवता कामा नये.
हरी ओम