Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”)

Forums Sai – The Guiding Spirit The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”) Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”)

#1517
The Importance of Having Complete Faith in the Sadguru
इतर देव सारे मायिक !
गुरूची शाश्वत देव एक !
चरणी ठेविता  विश्वास(Faith) देख !
रेखेवारी मेख मारी तो !!
आपल्यावर येणारे प्रत्येक संकट हे आपल्याच प्रारब्धामुळे येत असते .जेंव्हा भक्त सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून सद्गुरूंना अनन्य शरण जातो , तेंव्हा सद्गुरू त्या भक्ताच्या खडतर प्रारब्धवरही काट  मारतो व मृत्यूलाही  रोखतो.
श्री साईसतच्चरीतात  १३ व्या अध्यायात आलेली भिमाजी पाटलांची कथा व मन :सामर्थ्यदातावीड  वर प्रकाशित झालेला डॉ .राजीव कर्णिकांचा अनुभव , या दोन्ही प्रसंगात आपल्याला सद्गुरूंची हि अतर्क्य शक्ती प्रत्ययाला येते.
१. सर्व उपचार करून थकल्यावर क्षयरोगाने पिडीत झालेले, मरणासन्न अवस्थेतील भिमाजी कळवल्याने परमेश्वरच धावा  करतात व त्यांच्या धाव्याने परमेश्वर गहिवरतो . भिमाजींच्या धाव्याला भगवंताने दिलेला प्रतिसाद म्हणजे भिमाजींना त्यांचे स्नेही नानासाहेब चांदोरकर यांना पत्र लिहिण्याची बुद्धी होते . साईभक्त नाना भिमाजींना साईनाथांना शरण जाण्यास सांगतात .
    डॉ . राजीव कर्णिकांना असाध्य असा ब्लड कॅन्सर   (Blood  Cancer ) झाल्यावर त्यांची पत्नी डॉ प्रिया हि बापूंचा कळवल्याने धावा करते , टाहो फोडते . डॉ प्रियाच्या हाकेला बापूंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे बापू तिला निरोप पाठवतात :- ” मी आहे “.
दोन्ही ठिकाणी लक्षात येते कि भक्त जेंव्हा कळवळून सद्गुरूंना हाक  मारतो, तेंव्हा सद्गुरू त्याला प्रतिसाद देतातच !!

२. धीर खचलेले ,  मरणासन्न अवस्थेतील भिमाजी जेंव्हा शिर्डीला येऊन मशिदीमध्ये बाबांना भेटतात , तेंव्हा बाबा त्यांना धीर देतात , ” तू शिर्डीमध्ये , या मशिदीत पाय ठेवलास , तेंव्हाच तुझे सगळे भोग संपले . त्यामुळे तू आता खंत करू नकोस . एक – दोन दिवसांत तुला आराम पडेल .”
असाध्य अशा रक्ताच्या कर्करोगामुळे धीर खचलेल्या , निराश झालेल्या डॉ  कर्णिकांच्या मनात जेंव्हा आत्मघाताचे विचार येऊ लागतात , तेंव्हा बापू नंदाई जवळ त्यांना निरोप पाठवतात – ” don’t  worry . you  are  going  to  win  the  battle .”  बापू , नंदाई  व सुचितदादांकडून मिळालेल्या धीरामुळेच डॉ कर्णिक केमोथेरापिसारख्या खडतर उपचारांना धैर्याने सामोरे गेले .
श्री  साईसतच्चरीतातही म्हटले आहे –
धैर्य तीच गे बाई सबुरी !
सांडू नको तिजला दुरी !
पडता केंव्हाही जडभारी !
हीच परपारी नेईल !! (अध्याय क्र .१९ ओवी क्र .५३ )
खडतर प्रारब्धामधून  यशस्वीपणे  पार जाण्यासाठी आवश्यक असणारे धैर्यही सद्गुरूच आपल्या भक्तांना पुरवत असतात , हे दोन्ही प्रसंगातून लक्षात येते .
३. शिर्डीत बाबांच्या सांगण्यानुसार भीमाबाईच्या घरी राहिल्यानंतर भीमाजींना स्वप्न पडते . स्वप्नात त्यांच्या लहानपणीचे एक शिक्षक एक कविता पाठ करण्यासाठी त्यांना छडीने खूप मार देतात . तसेच , एक गृहस्थ त्यांच्या छातीचा पाटा  करून त्यावर खूप जोरजोराने वरवंटा फिरवतो . त्यानंतर दुसऱ्या  दिवशी पहाटे भीमाजी  जेंव्हा झोपेतून उठतात , तेंव्हा त्यांचे दुखणे बरे झालेले असते .
 डॉ कर्णिकांना स्वप्नात दिसते कि बापू झाडूने त्यांची छाती साफ करत आहेत.दुसऱ्या  दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर कर्णिकांना जाणवते कि बापूंनी स्वप्नात जणूकाही त्यांची फुफ्फुसेच साफ केली आहेत . याआधी कृत्रिम श्वासोछवासावर   असणारे कर्णिक नंतर मोकळेपणाने श्वास घेऊ लागतात .
 यावरून लक्षात येते कि , दोन्ही भक्तांचे प्रारब्ध बापूंनी स्वप्नामध्येच धूउन टाकले , नष्ट केले.

४. भीमाजींच्या अनुभवात भिमाजींचे स्नेही नानासाहेब चांदोरकर  यांना साईनबद्दल – स्वतः च्या सद्गुरुंबद्दल ठाम विश्वास असतो कि : केवळ एकमेव माझे साईनाथच भिमाजीची व्याधी पूर्ण बरी करू शकतात  व बाबा भिमाजीला नक्की बरे करणार .
 डॉ कर्णिकांच्या अनुभवात त्यांची पत्नी डॉ प्रिया हिला बापुंबद्दल  : स्वतः च्या सद्गुरुंबद्दल पूर्ण विश्वास असतो की, “केवळ बापूच माझ्या पतीला असाध्य अशा रक्ताच्या कर्करोगामधून पूर्णपणे बरे करू शकतात व बापू माझ्या पतीला नक्की बरे करणार .”
 दोन्ही अनुभवांमधील भक्तांचा आपल्या सद्गुरूंवर असणारा ठाम विश्वास दिसून येतो.
 सद्गुरूही आपल्या भक्ताचा विश्वास खाली पडू देत नाही व भिमाजी व डॉ कर्णिक दोघांनाही सद्गुरू बरे करतात .
५. भीमाजींच्या क्षयरोगावर वैद्य , हकीम , डॉक्टर , देवदेवस्की असे सर्व उपचार केले गेले, पण कुणीच भीमाजीला बरे करू शकले नाही , सर्वांनी हात टेकले.
 जे इतरांना शक्य झाले नाही ते सैनाथांनी मात्र शक्य केले व भिमाजीचा दुर्धर असा क्षयरोग बरा केला.
 डॉ कर्णिकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी त्यांना पुढची ट्रीटमेंट देणे अशक्य वाटत होते. पण बापूंनी मात्र कर्णिकांचा ब्लड कॅन्सर पुरपणे बारा केला – जे अशक्य होते ते शक्य केले .
बापू म्हणतात :
” तू आणि मी मिळून शक्य नाही असे या जगात काहीही नाही.” ( मी = सद्गुरूकृपा  ; तू = भक्ताचा विश्वास )
म्हणूनच भक्ताने जर सद्गुरूंवर पूर्ण विश्वास टाकला तर त्यासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टीही सद्गुरू शक्य करतात .

६. शिर्डीत येण्यापूर्वी भिमाजी बाबांना ओळखत नसतात . पण दुर्धर अशा क्षयरोगातून बाबांनी बरे केल्यावर भिमाजींना साईनाथांच्या परमेश्वरी स्वरुपाची साक्ष पटते . व बाबांप्रती कृतज्ञ होऊन बाबांच्या भक्तीत कायमचे रममाण होतात .
    ब्लड कॅन्सर होण्यापूर्वी डॉ कर्णिकांना सद्गुरू बापूंच्या दैवी स्वरुपाची जाणीव नसते. पण जेंव्हा बापू त्यांना असाध्य अशा रोगातून बरे करतात ,तेंव्हा त्यांना बापूंच्या दैवी स्वरुपाची खात्री होते व बापुंप्रती कृतज्ञ होऊन ते बापूंच्या भक्तीत स्थिर होतात .
   दोन्ही अनुभवांवरून लक्षात येते की  सद्गुरूंनी भिमाजी व डॉ  कर्णिक यांचे गंडांतर तर टाळलेच , पण एवढेच नव्हे तर, मनुष्याजन्मासाठी सर्वात श्रेयस्कर असा जो भक्तिमार्ग , त्या भक्तीमार्गामध्ये दोघांनाही स्थिर केले . म्हणजेच त्यांचे वाईट प्रारब्ध केवळ  नाही तर वाईट प्रारब्धाचे रुपांतर चांगल्या  प्रारब्धामध्ये केले. हीच सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ कृपा होय !! या कृपेचे कारण एकाच – त्यांचे अकारण कारुण्य !

सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, पण ज्या घराची दारे, खिडक्या  उघडी असतात , त्या घरातच सूर्यप्रकाश पोचू शकतो . तसेच सद्गुरू सर्वांवर समानपणे कृपा करत असतात . पण ज्याच्या मनाची कवाडे कुतर्क , संशय , शंका – कुशंका यांनी बंद असतात त्याच्यापर्यंत सद्गुरूंची कृपा पोचू शकत नाही .
सद्गुरूंची कृपा तर सदैव , प्रत्येक क्षणी  असतेच – प्रत्येकावर – समानपणे . पण ज्याचा सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असतो ,  सद्गुरूंची कृपा स्वीकारू शकतो .
सद्गुरूंना कृपा करण्यासाठी भक्ताकडून मंत्र , जप , ताप , पूजा करण्याची किंवा इतर कोणत्याही साधनाची गरज नसते . पण भक्ताला मात्र सद्गुरूंची कृपा स्वीकारता येण्यासाठी ” एक विश्वास “ मात्र असावा लागतो.
नलगे साधनसंपन्नता  !
नलगे षटशास्त्रचातुर्यता !
एक विश्वास असावा पुरता !
कर्ता  हर्ता  गुरु ऐसा !!  (अध्याय क्र .१९ , ओवी क्र .७४ )
आमची शोकांतिका हीच असते कि सद्गुरूंनाच आम्हाला सांगायची वेळ येते – ” राजांनो , विश्वास ठेवा, विश्वास पक्का करा .”
सद्गुरू बापूंनी सांगितल्या प्रमाणे या वर्षी म्हणजेच २०१२ साली आपल्याला सद्गुरुंवरचा विश्वास पक्का करण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे . आता शेताचा फक्त एक महिना राहिला आहे . पण तोही नसे थोडका !! या सुवर्नासंधीचे सोने व्हावे , हीच बापुचारणी प्रार्थना . यावर्षी जर आपला सद्गुरुंवरचा विश्वास पक्का झाला, तर पुढच्या काळात आमचे सहजपणे रक्षण  करून बापू आम्हाला २०२५ साली येणाऱ्या रामराज्यात घेऊन जाणार आहेत !!
गुरु जरी महा प्रबळ !
अपेक्षी शिष्यप्रज्ञाच केवळ !
गुरुपदी निष्ठा सबळ !
                                             धैर्यबळ सबुरी !! (अध्याय क्र .१९ , ओवी क्र .५८)
निष्ठा + सबुरी  = विश्वास
सद्गुरुतत्व – मग ते श्री स्वामी समर्थांच्या रुपात असेल तर कधी साईनाथांच्या रुपात असेल किंवा सद्गुरू अनिरुद्धांच्या रुपात असेल – तो आहे एकच  आणि मला तारणारा किंवा मारणारा तोच एकमेव आहे हेच शाश्वत सत्य आहे !!

!! हरी ओम  !!

स्मितावीरा घुले
पुणे