Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-the maxim

#1500

,हरि  ओम

एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा …..
बापूंनी आपल्याला दिलेला हा संकल्प….the maxim…सद्गुरू वरचा  दृढ विश्वास हा भक्ताचं कल्याण करतो.
साई -सच्चं रित्रा तील(Shree Saisatcharit) सर्व भक्तांनी सद्गुरू साई नाथांवर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे .सद्गुरू माझ्या साठी जे करतील तेच योग्य.आणि बाकी सर्व अयोग्य आणि म्हणूनच ते श्रेष्ठ भक्त -श्रेष्ठ श्रद्धावान ठरले.
माझ्या आयुष्याचा कर्ता -करविता माझा सद्गुरूच आहे .माझ्या आयुष्यात जे जे घडते ते त्याच्याच इच्छेने ..
जे जे मजसाठी उचित  ।तेची तू देशील खचित ।
हे मात्र मी नक्की जाणीत ।नाही तक्रार राघवा ।।
९व्या अध्यायात आपण बघतो , ज्या ज्या भक्तांनी साई -नाथांवर (Sainath) पूर्ण विश्वास ठेऊन त्यांची आज्ञा मानली
त्यांचे कल्याण झाले .
आणि म्हणूनच सद्गुरूंवर(Sadguru) पूर्ण विश्वास ठेऊन आपला जीवन प्रवास सुखाचा होतो.
माधुरीवीरा पारकर ,
पुणे