Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-Reason for dissatisfaction in life

#1489

Pramod Bankapure
Participant

Reason for dissatisfaction in life

____  हरि ॐ

        इतर देव सारे मायिक गुरुचि शाश्वत देव एक ।

        चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारीतो ॥

***************************************************************

        साईसच्चरितातील(Shree Saisatcharit) अध्याय १० मधील चवथी ओवी आहे ही. या ओवीतून हेमाड्पंतांनी (Hemadpant) आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्तांसा्ठी अत्यंत बोधप्रद असे मार्गदर्शन केले आहे. सद्गुरुचे विशे्षत्व सांगितले आहे आपण नेहेमीच्या जीवनात पाहतो की प्रत्येक माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक अडचणी येत असतात संकटे येत असतात आणी या अडचणींमधून संकटामधून बाहेर पड्ण्य़ासाठी ती व्यक्ती तीच्या बुध्दीच्या क्षमतेनुसार प्रयत्न करीतच असते अशा या प्रयत्नांमधे एखाध्या देवाला नवस बोलणे गंडेदोरे करणे बुवाबाजीच्या नादी लागणे हे प्रकारसुध्दा घड्तच असतात त्यातून ती व्यक्ती थोडीफार बाहेर येतेसुध्दा, पण पुन्हा पुढे दुसरे संकट आ वासून उभेच असते,संकटांची मालिका सुरुंच असते.परिस्थितीशी मुकाबला करता करता तो अगदी गांजून गेलेला असतो ,

जीवनात शांती नसते अतृप्तता(insatiable) असमाधान(dissatisfaction) असते याचे कारण (reason)म्ह्णजे त्याला सद्गुरुचे पाठबळ नसते त्याला त्याच्या प्रारब्धकर्मामुळे अजुन सद्गुरु भेटलेला नसतो किंवा त्याने बुवाबाजीच्या नादी न लागता खऱ्याखुऱ्या सद्गुरुचा स्वीकार केलेला नसतो.

        सद्गुरुसारख्या कुशल नावाड्याच्या हाती जीवन नौका सोपविल्याशिवाय माझ्या जीवनाचा प्रवास ह्या भवसागरातून स्थीरपणे शांतपणे कसा बरे होऊ शकेल?

        या जीवनाच्या प्रवासात कितीही वाद्ळे जरी आली , महासागर खवळला तरीही सद्गुरुसारखा नावेचा कप्तान असल्यावर भितीचे काहीच कारण नाही कारण पैलतीरावर अलगदपणे सुखरुपपणे तो नेणारच असतो.

         तेहेतीसकोटी देवांमध्ये सद्गुरुचे स्थान सर्वोच्च आहे सर्वात वरचे आहे कारण सद्गुरु हाच ब्रम्हा विष्णु आणि महेश आहे सद्गुरु म्हणजे्च साक्षात परमात्मा आहे त्यामुळेच हा चिरंतन आहे शाश्वत आहे आणि त्याच्या चरणी आश्रय घेतल्याने निश्चितच शाश्वत चिरंतन निश्चिंतता मिळ्णार आहे.

         जेंव्हा मी सद्गुरुला पूर्ण शरण जातो तेव्हा सद्गुरु मी जसा आहे तसा, माझ्या सर्व गुणदोषांसकट माझा स्वीकार करतो.

         सद्गुरुचरणीं मी जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा नितीच्या मार्गाने पुढे घेऊन जाणारी सद्गुरुंची दॄष्टी मला धर्म व पुरुषार्थ मार्गावर स्थिर करते व त्याचवेळी यज्ञेन दानेन तपसा या मार्गाने सद्गुरू माझा जीवनविकास साधून

देतो आणि माझ्यावर कृपा करून मला बल बुद्धी व पुरुषार्थ प्रदान करतो

         जर मला एखादी गोष्ट हवी आहे तर सद्गुरू मला ती गोष्ट उचित असेल त्यापासून भविष्यात मला  काही त्रास नसेल तरच देतो आणि ते सुद्धा उचित वेळ आल्यावरच देतो आणि ती उचित वेळ येईपर्यंतच्या खडतर काळात माझे रक्षणही तोच करत असतो

   —याठिकाणी गुरुशिष्याची एक गोष्ट सांगावीशी वाटते

          शिष्य आपल्या आयुष्याचा प्रवास बघत असताना जेव्हा त्याच्या आयुष्याचा चांगला काळ असतो त्यावेळी त्याठिकाणी त्याला चार पावले उमटलेली दिसतात शिष्य खुश होतो की माझ्या दोन पावलाबरोबर माझ्या गुरुचीपण दोन पावले आहेत म्हणजे माझा गुरु माझ्या सोबतच आहे पण जेव्हा तो त्याच्या जीवनाच्या खडतर काळाचा प्रवास बघतो तेव्हा केवळ दोनच पावले दिसतात शिष्याला वाईट वाटते तो गुरुना विचारतो माझ्या जीवनाच्या खडतर प्रवासात तुम्ही माझ्याबरोबर नव्हता का, तेव्हा गुरु म्हणतात, अरे नीट बघ ती तुला दिसलेली दोन पावले माझीच आहेत, त्या खडतर प्रवासात मी तुला उचलून खांद्यावर घेतले होते, शिष्याला आपली चूक उमगते व त्याचा ऊर प्रेमाने भरून येतो.

तर असा हा सद्गुरू असतो  लाभेवीण प्रेम करणारा

       माझ्यासाठी उचित वेळ येईपर्यंत सद्गुरू मला काही देत नाही घडवत असतो पण योग्य वेळ आल्यावर मुक्तहस्ताने कृपेची बरसात करतो आणि सद्गुरे जे देतो ते आयुष्यभरासाठी पुरणारे असते आणि ज्यापासून चिरकाल टिकणारे समाधान मिळेल असेच तो मला देत असतो .

       सद्गुरुचरणी धृढ होण्यासाठी केलेले प्रयास म्हणजेच भक्ती, आता भक्ती करायची म्हणजे यामध्ये सद्गुरूचे नामस्मरण,त्याचे ध्यान, स्तोत्र पठण, गुणसंकीर्तन या गोष्टी येतात, सद्गुरूचे नाम घेता घेता एकदा का सद्गुरूची गोडी लागली, सद्गुरूचा छंद जडला की इतर घातक छंद आपोआपच दूर होतात सद्गुरूचे नाम घेण्याची इच्छा होणे हि सुद्धा त्याचीच कृपा आहे साईनाथ म्हणतात “तुझी जिज्ञासा हीच माझी कृपा “ सद्गुरू भेटण्यासाठी जेवढे नामस्मरण आवश्यक आहे तेवढेच तो भेटल्यावर सुद्धा आवश्यकच आहे कारण ह्या नामरूपी सेतूवरूनच हा सद्गुरू माझ्यामध्ये येत असतो हळूहळू चित्तशुद्ध व्हायला लागते मनातील इतर विचारांची गर्दी कमी व्हायला लागते मन सद्गुरुचरणी रमू लागते सद्गुरूच्या विरहाची भावना मनात निर्माण व्हायला लागते, जगातील अत्यंत सुंदर अशी ही गोष्ट आहे हि, “सद्गुरूच्या चरणांचा विरह” आणि त्यामुळे निर्माण होणारी भावोत्कटता, सद्गुरूच्या चरणाची आसक्ती, डोळ्यातून बाहेर येणारे सद्गुरूच्या प्रेमाचे विरहाचे अश्रू, मन बेभान होते, रोमारोमात फक्त सद्गुरुचेच अस्तित्व असते आणि अशा व्याकूळ अवस्थेत त्याला घातलेली प्रेमाची साद ही सर्व भक्तीचीच रूपे आहेत अशी ही भक्ती जेव्हा माझ्याकडून होऊ लागते तेव्हा माझ्या मनाचा ठाम निश्चय बनतो की माझा सखा माझा सोबती माझे सर्वस्व माझा परमेश्वर सर्व काही हा सद्गुरूच आहे धृढ विश्वास निर्माण होतो आपण त्याच्या चरणी अनन्य शरणागत होतो  न अन्य अनन्य तुझ्याशिवाय कोणीही नाही फक्त तूचि रे देवा, आता माझ्या जीवनाचा सूत्रधार तूच आहेस

            एक विश्वास असावा पुरता | करता हर्ता गुरु ऐसा ||

        अशी स्थिती बनते तेव्हा आपला सद्गुरुसुद्धा दाखवून देतो की “ होय मी तुझ्या सोबतच आहे तुझ्या चोहोबाजूंनी मी आहे आणि प्रचीतीपण देतो की

                || मी तुला कधीच टाकणार नाही ||          

                         

                                     || हरी ओम ||