Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-progress of life

#1491
progress of life
हरी ओम
साईसचरित हा ग्रंथ च मुळी साईंच्या सान्निध्यात आलेल्या भक्तांचे चरित्र आहे, तेच मुळी एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरू एसा ह्या आश्वासक शब्दांवर , आधारीत . अगदी मंगलाचरणा पासून . उगम कथे मध्ये बाबा आम्हाला शिकवतात की जर सद्गुरू वरील विश्वासाचा खुंटा ठोकून घट्ट केला तरच श्रद्धा आणि सबुरीच्या तळीतून एका श्रद्धावानाच्या जीवनाचा विकास (progress of life) होतो. हेच त्या प्रत्येंक भक्ताचेचरित्र…साईसचरित .. …….
आपल्या गुरू वारीला विश्वासाचे आणि प्रेमाचे नाते समजावताना बाबा म्हणताता, माझ्या गुरूंनी माझ्या कडे दोन पैसे मागितले आणि मी ते लागेच देऊन टाकले. ” तू मजकडे अनन्य पाही , पाहीन तुजकडे तैसाचा मीही” हे अनन्य पणे पाहणे म्हणजेच फक्त तू एक …हाच विश्वास .हे अनन्यपणे पाहणे म्हण जेच कुठलेही मुखवटे न धरता त्याच्या च समोर आहे तसे जाणे , मग आपल्या जीवनाचा करता हरता गुरू होतो हे साईसचरीतातील अनेक भक्तांच्या चरीतातूना जाणवतं. अशा ह्या साई सागरातील प्रत्येक भक्ताचे चरित्र अभ्यासून , त्याचे गुण सं कीर्तन करुन आपण विश्वासाने त्याच्याकडे पाउल टाकत त्याच्या कडे अनन्यपणे पाहायला हवे तरच ” एका विश्वास असावा पुरता , करता हरता गुरू ऐसा ही ओवी माझ्या जीवनात खर्या अर्थाने उतरेल .
हरी ओम
हर्षदावीरा कोलते