Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru new year resolution

#1496

vivek pawar
Member

new year resolution

हरि ओम

“एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||”

परमपूज्य बापूंनी या नववर्षाच्या सुरवातीस आपल्या सर्व श्रध्दावानांसाठी हा निश्चय करावयास सांगितला. आपण नववर्षाचे म्हणून किती निश्चय करतो व ते कसोशीने पाळतो किती हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. परंतू जेव्हा परमपूज्य बापू आम्हांस हे सांगत आहेत तेव्हा “आम्ही नेणू दूजा धर्म | आम्हा नाही लाज शरम | गुरुवचन पालन हेच वर्म | हाच आगम आम्हाते |” ह्या काकासाहेब दिक्षितांच्या भुमिकेत शिरण्याचा प्रामाणिक प्रयास हेच ह्या निश्चयामागील खरे बळ होय हयाची खात्रीच संपूर्ण साईसत चरितातून आम्ही अनुभवतो. परंतू त्यासाठी मात्र एकच गोष्ट नितांत आवशयक आहे ती म्हणजे

“असावे निर्मळ श्रद्धाबळ | वरी प्रज्ञेचे बळ प्रबळ |

सबुरीची जोड अढळ | परमार्थ सबळ तयाचा |”

“निर्मळ श्रद्धाबळ” व “सबुरीची जोड” या दोनं पायांवरच आमचा विश्वाश “अढळ” राहू शकतो कारण मनात येणाऱ्या शंका-कुशंकांना, संकल्प-विकल्पांना, जीवनात येणाऱ्या नानाविध अडचणी व संकटांना पुरून उरणारा म्हणजेच या सर्वाना हार न जाता त्यांवर मात करणारा विश्वासच आम्हांस “कर्ता हर्ता गुरु ऐसा” याची प्रचिती देतो. कसोटीच्या क्षणी विश्वास ढळतो किंवा अशा क्षणी आम्ही कमी पडतो कारण परिस्थितीवश झाल्यामुळे किंवा त्याक्षणी मनाची चंचलता प्रबळ ठरल्याने आम्हाला विश्वास दृढ ठेवणे कठीण जाते परंतु हा विश्वास दृढ करणे म्हणजे “कर्ता हर्ता गुरु ऐसा” ह्यालाच आमच्या जीवनाचे सूत्र बनविणे त्यासाठी सदगुरू साईनाथ आम्हांस स्पष्टपणे सांगतात कि,

“तुम्ही आपले कार्य करा | मनी यत्किंचितही न कचरा |

विश्वास पूर्ण मद्वचनी धरा | निर्धार करा मनाचा |”

मी माझ्या जीवनातील सर्व कर्मे करताना मग ती व्यावहारिक असो, प्रापंचिक असो किंवा अगदी पारमार्थिक असो त्या सर्वांमध्ये एकच समान सूत्र कार्यरत असते आणि ते सूत्र म्हणजे “सदगुरू” आणि म्हणूनच या प्रत्येक कृतीमधील माझी भूमिका म्हणजे

“प्रयत्न करणे माझे काम | यशदाता मंगलधाम |

अंती तोची देईल आराम | चिंतेचा उपशम होईल |”

हीच असणे म्हणजे “एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||”

हा दृढ विश्वास मनात कायम करणे आणि त्या साठीच “त्याचा” शब्द प्रमाण हा विश्वास मनात दृढ करण्याचा निर्धार हेच माझे काम. हे कार्य करताना यत्किंचितही कचरू नका फक्त “विश्वास पूर्ण मद्वचनी धरा” हाच मनाचा निर्धार पक्का करा ही सदगुरू साईनाथांची इच्छा आमचे कल्याण साधणारे आहे. ह्याचा पूर्ण विश्वास म्हणजेच “साईसच्चरित” व त्यातील भक्तांच्या कथा.

 

“श्री साईसच्चरिता सारखा अनमोल ठेवा आपल्या सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देणारे हेमाडपंत वयाची साठ वर्षे उलटल्या नंतरही इतके सुंदर सदगुरू गुणसंकीर्तानाचे कार्य करतात कारण त्यांचा सुस्पष्ट एकच विश्वास

“समर्थ साईंची निजस्थिती | यतार्थ वर्णाया कोणा गती |

स्वयेच भक्तार्थ कृपा करती | तरी ते वदविती स्वयेची |

वाणीची जेथ नं चाले धाव | तेथे मी का बांधिली हाव |

ऐसे बोलावायासी वाव | ठेविला न ठाव कवणाते |

उचलली जेव्हा हाती लेखन | बाबांनी हरिले माझे मी पण |

लिहिती आपली कथा आपण | ज्याचे भूषण त्याजला |”

 

हा विश्वास म्हणजेच “कर्ता हर्ता गुरु ऐसा” ह्यांची हेमाडपंताना आलेली सुंदर प्रचिती.

साईसच्चरिताच्या सातव्या अध्यायात आम्हाला भेटतो “एक भोळा भाविक” भक्त ज्याचे डोळे सुजून लाल झालेले रक्तबंबाळ बुबुळे घेवून बाबांकडे येतो  आणि बाबा चक्क बिब्बे ठेचून त्याचे गोळे त्या भक्ताच्या डोळ्यात घालतात .डोळयासारखा नाजूक अवयव व बिब्यासारखा जहाल पदार्थ किंबहुना पूर्णपणे विपरीत असा “बाबांचा उपाय “ परंतु कोणताही विकल्प वा भितीशिवाय “भोळा भाविक” भक्त हा उपचार करवून घेतो कारण “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा त्याचा भोळा भाव अश्या अवघड प्रसंगालाही पुरून उरला आणि म्हणूनच त्याला “निर्मळ डोळे’ पुन्हा प्राप्त झाले.

“जोगाई जाखाई मरीआई | शनि शंकर अंबाबाई |

मारुती खंडोबा म्हाळसाई | ठायी ठायी शिरडीत|

परि अवघड प्रसंग येता | कामी पडेना एकही ग्रामस्था |

तयांचा तो चालता बोलता धावता | संकटी पावता एक साई |”

हा सकल शिर्डीवासीयांचा विश्वासच प्रचंड वादळी पावसाचा सामना करताना कामी आला आणि त्यातून त्यांनी आश्रय घेतला तो समर्थ साईनाथांच्या ‘द्वारकामाईचा’ .व त्यातूनच आम्हा सर्व श्रद्धावानांना ते स्पष्टपणे शिकवितात कि “माझ्यावरील संकटांपेक्षा माझा देव मोठा आहे” मग अशी अनेक वादळे येतील आणि जातील कारण त्यांना पुरून उरणारा एकच विश्वास म्हणजे “कर्ता हर्ता गुरु ऐसा”.

“उत्तरी कळविती एकाच उपाय | साईबाबांचे धरावे पाय |

हाची केवळ तरणोपाय | बाप माय तो एक |”

या नानासाहेब चांदोरकरां सारख्या खऱ्या आप्ताचा सल्ला शिरोधार्य मानून बाबांच्या चरणी धावून येणारा व “केवळ बाबांचा शब्द प्रमाण | तेची औषध रामबाण |” या सच्च्या विश्वासाने भीमाबाईच्या घरी निशंक पणे राहणारा भिमाजी पाटील दुस्सह्य प्राणांतिक व्यथेतूनही तरला अगदी राहण्याची जागा ओली विकाल्पास्पद असली तरीही कारण नानासाहेब चांदोरकर या श्रद्धावान आप्ताचा सल्ला प्रमाण मानून“साईनाथांचा” आपल्या जीवनाचा तारणहार म्हणून त्यांनी बाबांचा केलेला मन:पूर्वक स्वीकार म्हणजेच “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा पूर्ण विश्वास हिवतापाने त्रस्त बाळा शिंपी मोठा भाविक भक्त आणि म्हणूनच

“परि औषध तो संतांचा शब्द | देतील तो जो मानी प्रमाण |

तया न अगद आणिक | याचे उत्तम उदाहरण |

कारण बाबांचा शब्द |”

हेच या प्रमाण नुसार दहीभाताचे कवळ काळ्या कुत्र्यास लक्ष्मी आईच्या देवळासमोर जाऊन घालतो व हिवताप मुक्त होतो तो याच विश्वासातून “कर्ता हर्ता गुरु ऐसा”. हा विश्वास हेच खरे औषध जे आपल्याला सर…