Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-love of Baba

#1493

हरी ओम दादा,

“एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा “

साई सत्चारित्र (Shree Saisatcharitra) मधील या ओवीचे महत्व  आज मला परम पूज्य बापुंमुळे कळले आहे. जशी जशी पंचशील परीक्षा(Panchsheel Exam) देणे सुरु केले आहे तस तसे साईनाथाना तेव्हा लोकांना काय पटवून द्यायचे होते ते समजते आहे. त्या चरित्रातील भक्तांचे बाबांबाबत्चे प्रेम(Love) अवर्णनीय आहे. त्यांच्या सारखे प्रेम मला करता आले पाहिजे आणी ते माझ्याकडून माझे बापू नक्की करून घेणारच.१०८% . त्यासाठीची सर्वप्रथम तयारी बापू पंचशील परीक्षेमधून करून घेत आहेत. माझा प्रवास प्रथमा पासून चतुर्थी पर्यंत असा सध्या पूर्ण झाला. आता पंचमी. परंतु आतापर्यतच्या बापूनी माझ्याकडून करून घेतलेल्या प्रयासामधून साई चरित्र कसे वाचायचे, ते आपल्या जीवनात कसे उतरवायचे आणी ते करत असताना म्हणजेच उतरवताना आपल्याला सद्गुरू आणी भक्त यात कसल्याही प्रकारचे अंतर नसते तर सद्गुरू आपल्या अवतीभोवती किंबहुना आपल्या मध्येच असतो हे मी शिकले. 

नाही सोडावे दारा नाही सोडावे घर तरीही पावावे परमार्थ अनिरुद्ध नावे 
अर्थ अनर्थ मी न जाणतो योग्य अयोग्य न ओळखतो चरण तुझे मी धरतो सांभाळी आता.” 

बापुंच्यामुळेच आज माझ्या जीवनात माझा देव खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाला आहे. आतापर्यंत काही समजत नव्हते ते आज स्वतः समजून घेवून दुसऱ्याना पण समजावून सांगता येवू लागले आहे. श्री राम.  बापू वारंवार आपल्या भक्ताला कोणताही त्रास होऊ नये या त्यांच्या वात्साल्यापोटी  आपल्या  जन्मदात्याच्या ही पलीकडे आपली काळजी घेत   आहेत. हे फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतो जे त्या काळी साई बाबांनी केले. कलियुगात प्रत्येकाला प्रारब्धाचे भोग भोगावे लागणार आहेतच पण बापुंमुळे आज त्याची झळ आम्हाला जाणवत ही  नाही . आता तर बापूनी सांगितलेच आहे की आमचा  दोन्हीकडे जन्म  आहे . माझा बापू त्याच्या लेकरांची किती सोय करतो आहे खरच!!! कोण करेल एवढे सांगा? आज आम्ही बापूंकडे आहोत यासारखे दुसरे समाधान नाही.  योग्य दिशेने कसे जगायचे ते बापूने मला शिकवले. जीवन जगताना कितीही संकटे आली तरी सर्व संकटआन्पेक्षा माझा बापूच मोठा आहे हे माझ्या मनात खोलवर बापुनीच रुजवले आहे.

दादा, तुम्ही सुरु केलेल्या या ब्लोगमुळे तर आता साई सत्चारित्र अजून छान कळू लागले आहे. श्री राम.

विश्वास म्हणजे नक्की काय? तो  ठेवायचा कसा? त्याने कोणते बदल आपल्या जीवनात घडतात? हे फक्त तो ठेवल्यावरच कळतो हे मात्र बापुंमुळेच कळले.

साई-अनिरुद्ध माझ्या जीवनात सदैव कार्यरत राहो त्याच्या चरणांच्या शिवाय मला दुसरे काही नको हीच सद्गुरू बापू चरणी मनोमन प्रार्थना..

तुझ्या चरणांची धूळ हेच आमचे धर्म कुल 
चरणाच्या सेवेसाठी मना लागे तळमळ मना  लागे तळमळ.” 

श्री राम.