Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru importance of namaskar

#1497
importance of namaskar
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा
लहानपणापासूनच आपले आई आणि वडील सकाळी उठल्या बरोबर आपल्याला देवाला नमस्कार करायला सांगतात.पण हा नमस्कार का करायचा,हा नक्की कोणापर्यंत  पोचतो हे लहान वयात आपल्याला आणि अर्थातच सर्व देवांच भक्ती करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना हि बहुदा माहित नसतच.साइसत्चरित्र वाचून आत्ता कुठे आपण हे समजून घेऊ शकत आहोत कि या सद्गुरू तत्वापुढे कोणीच मोठ व श्रेष्ठ नाही.मातृवात्साल्याविन्दानाम या ग्रंथात पण असच उल्लेख आहे.आपण ज्यांना देव म्हणून देव्हाऱ्यात ठेवतो व नित्य पूजा कतो ते सर्व शिवात्मे आहेत आणि त्यांना परमात्म्याने त्यांच्या कार्याची दिशा व मर्यादा घालून दिल्या आहेत म्हणूनच साई सत्चारीत्रातील ओवी मनोमन पटते.
“इतर देव ते सारे माईक | गुरूची शाश्वत देव एक | चरणी ठेवीत विश्वास देख | रेखेवर मेख मारी  तो ||”
पण हा विश्वास निर्माण होण्यासाठी भक्ती आणि भक्तीच आवश्यक आहे.पूर्ण प्रेमाने त्या परमात्म्याचे केलेले स्मरणाच आपल्या मदतीला येते.अशी भक्ती करण्यासाठी आपल्या कडे कोणतीही चातुर्यता,साधन संपन्नता
लागत नसून फक्त प्रेम पूर्वक विश्वास आवश्यक असतो .कोणत्याही संकटा पेक्षा माझा बापू मोठा हे तत्व संकटातून बाहेर पडल्यावर तर कळताच पण त्यातून पार पडत असताना हि माझा सद्गुरू माझ्या बरोबर आहे या विश्वासाने मनात कोणतीच भीती राहत नाही.माझ्या संकटाशी लढायला मला तो कधीच  एकटा सोडत नाही.उलट तो माझा कवच बनतो,तोच युद्ध करतो,संकटातून बाहेर पडल्यावर कवतूक हि करतो.माझा मायबाप बापू माझ्या बरोबर आहे या एकाच विश्वासाने मनाला सामर्थ्य येते.किती तरी आपल्या ताकदीच्या बाहेरची कामे आपण सहज करू शकतो.त्यात यशस्वी होतो पण त्या यशामागे खरे कर्तृत्व   माझ्या सद्गुरूंचे असते.श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज असेच सांगतो कि हा परमात्मा मला हि ताकद पुरवत असतो म्हणून कोणत्याही कार्याच्या सुरवातीला,कार्य चालू असताना,व कार्य संपल्यावर ते सर्व फक्त “त्याच्या” चाराणापाशीच  मला समर्पित करायचे आहे.
नाहं कर्ता हरी कर्ता ,हरी कर्ता हि केवलं,ओम हरी ओम तत्सत.
हरी ओम.
वृंदा केदार टाकळकर
पुणे