Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru Experiences in Krupasindhu magazine

#1494

Yogesh Joshi
Member

Experiences in Krupasindhu magazine

हरी ओम

अध्याय ३१ मध्ये श्री बाळाराम मानकारांच्या (Balaram Mankar) कथेमध्ये श्री साईनाथ (Sainath) त्यांना दर्शन देताना म्हणतात  – “साडेतीन हाताचीया घरा | शिरडीबाहेर नव्हतो तुज “. येथे आपल्याला बोध होतो ओमकाराच्या “एकोस्मी बहुस्याम”चा. जसे बाबांचा साडेतीन हाताचा स्थूल देह आहे तसेच ह्या सगुण प्रणवाचे स्थान आहे साडेतीन शक्ती पीठे. येथे साई नाथ आपल्या सर्वसाक्षीपणाची ओळख करून देतानाच सर्वांसाठी महत्वाची शिकवण देतात की – माझे सगुण साकार रूप असो कि निर्गुण अवतार , माझ्यावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्या हाकेला मी धावून येतोच येतो. मग तेथे भौतिक अंतर किती आहे ह्याचा हिशेब नसतो. जो परमात्मा शिरडीत आहे तोच त्या मच्छिंद्र गडावर आहे. ह्यासाठी फक्त आवश्यक आहे तो भक्ताचा एकमात्र विश्वास कारण ह्याचा क्रम जातो श्रद्धा — विश्वास — प्रचीती ह्याच मार्गाने. आज आपणास सदगुरू बापूनी ह्यावर्षी एकाच टार्गेट दिले आहे आणि त्याचा अभ्यास करताना आपला विश्वास एवढा बळकट होत जातो कि माझी सदगुरू माउली जे माझ्यासाठी करणार ते उचितच असणार ह्यापलीकडे जावून जे जे माझ्या आयुष्यात घडते आहे ते निव्वळ माझ्या सदगुरुच्या कृपेनेच ह्या स्टेज पर्यंत वाढत जातो. अशा वेळी आपणास एखादा लहानसा अपघात होतो …….. समजा घराच्या घरी उंच टेबलावरून पडलो ……… तर मी देवाला दुषणे न देता उलट आभार मानायला शिकतो कि बापू राया हा अपघात जर माझ्या गाडीला झाला असता तर मला किती मोठी दुखापत झाली असती त्या ऐवजी त्या मोठ्या संकटाचे रूपांतर तू अलगदपणे लहान व मला झेपेल अशा गोष्टीत केलेस. हा विश्वास श्री माधवरावांकडे होता म्हणून तर त्यांना साक्षात शाबरी मंत्राने आपत्ती निवारण करून साई नाथानी जीवदान दिले गेले. आज सुद्धा आपण “कृपासिंधु”(Krupasindhu magazine)) मधून कित्येक भक्तांचे अनुभव वाचून आश्चर्य चकित होतो कि हे कसे शक्य झाले. कारण जे वाचले ते मानवी पातळीवर निव्वळ अशक्य गोष्टी होत्या. साई नाथ सुद्धा अमीर शक्कर साठी थंड, ओबड धोबड व अतिशय कष्टाची जागा त्याच्या संधीवाताच्या उपचाराच्या वेळेस आराम करण्यासाठी देतात. ह्यात आपण पाहतो कि त्याचा विश्वास थोडासा ढळला तर त्याच्यावर कसा बाका प्रसंग येतो….. आणि तेच पुन्हा पूर्ण विश्वासाने सदगुरूचे नाव घेतले तर कसे कठीण प्रसंगातून अलगद निवारण होते. ह्या सर्व गोष्टी म्हणजे फक्त त्याचे अकारण कारुण्य आणि म्हणून घडवलेली “लीला”. मात्र ह्या सर्व कथांमध्ये एक गोम ठळकपणे अधोरेखित केली जाते – ” एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरू ऐसा ” आणि ह्याचे अतिशय सुंदर उदाहरण आपण पोथीमध्ये पाहतो ते अध्याय ४० मध्ये श्री हेमाडपंत आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या घरी झालेले बाबांचे आगमन. श्री राम ||