Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-Doctor Pillai

#1515

Suneeta Karande
Participant
हरि ओम.
सहज चाळताना लक्षात आले की मागच्या वर्षी परम पूज्य समीरदादांनी अधिवेशनाच्याच्या पहिल्या दिवशी (१३-११-२०११) श्रद्धावानांना अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले होते -पिल्लेंच्या गोष्टीतुन काय शिकायचे ते परमपूज्य समीरदादांच्या शब्दांत (अधिवेशनाचा काही भाग)
आमच्या जीवनात हे सदगुरुंबद्दलचे तर्क- कुतर्क २ प्रकारे काम करतात.
१) भक्तीमार्गात नव्याने येणारा भक्त
२) भक्तीमार्गात स्थिरावलेला भक्त
दुसरा प्रकार म्हणजे भक्तीमार्गात स्थिरावलेला भक्त.  आपण श्रीसाईसच्चरिताच्या आधारे कसे ते पाहू या.
Doctor  Pillai पिल्ले- हा तसे पाहिला गेले तर भक्तीमार्गात स्थिरावलेला भक्त आहे, वरच्या  पातळीवर गेलेला भक्त. Doctor Pillai पिल्ले साईनाथांच्या अत्यंत जवळचे. बाबांबरोबर सततचा सहवास. बाबा त्यांना प्रेमाने भाऊ म्हणत. चिलीम ओढताना, विडी ओढताना बाबांना सतत भाऊ बरोबर लागे. भाऊशिवाय बाबांना करमत नसे. हे पिल्ले बसतात कोठे? कठड्याबाहेर बसायला जागा भाऊचीच. म्हणजेच सख्यभक्तीत बाबांच्या अगदी जवळ पोहोचलेला. पण नारु होतो. पराकोटीच्या वेदना – सहन होत नाही. मरण द्या,
ताकद नाही सहन करण्याची , पुढचे १० जन्म येउ दे, भोग भोगीन. हा जन्म पुरे आता, पुढच्या १० जन्मात भोग भोगीन. साईनाथ निरोप पाठवतात. पिल्लेंची ही गोष्ट नीट बघा. काय विचारतात ते बाबांना – शुद्धाचरणे वर्तता , का मज ही अवस्था ? दुष्कर्माच्या वाटे न जाता , का मजही दु:खावस्था?
येथे साईनाथांना Doctor  पिल्ले प्रश्न विचारतात. का ?  साक्षात “त्या” ला  का ? हा प्रश्न आला. तरी देखील बाबा म्हणतात तु निर्भय रहा, निरोप पाठवितात आपण दोघे मिळोन भोगु. मोक्ष, स्वार्थ, परमार्थ देण्या मी समर्थ असतांना, हाच तुझा का पुरुषार्थ? ही माझी (पिल्लेंची) अवस्था का ?   हाच का तुझा माझ्यावरचा विश्वास? सख्य मार्गात राहूनही माझ्यावरचा विश्वास ढळला का?
नंतर साईनाथ (काऊची) गोष्ट घडवुन आणतात. येथे पिल्लेंच्या डोक्यात कळ गेली, ती आम्हांला दिसली. पण सगळ्यात महत्त्वाचे ( माझे) साईनाथ काय भोगतात (माझ्यासाठी) ? काय भोगले “त्या”ने? पिल्लेंची वेदना खुप वर गेली, कळ मस्तकात भिनली, पण साईनाथांनी काय भोगले?
अविश्वासाचे दु:ख !!!!!! हे सदगुरुला होते, तेच हे दु:ख, हा सदगुरुंवरचा भोग. साईनाथांची इच्छा नसतानाही हा प्रसंग घडवून आणावा लागला. ह्या जन्मात १०-१५ दिवस (अजुन) हा भोग भोगावा लागला असता – पण ती ( माझी ) ताकद संपली. कोठेतरी “त्या” च्यावरचा हा विश्वास ढळला
– हीच ती १ पाउली वाट – हाच भक्ताचा अनुभव स्वानुभव – “प्रमाण” बनतो, तेव्हाच कुशंकीत मन सुधारते. चंचल मन, कुशंकी मन ताळ्यावर येउन प्रगती होते.
पिल्ल्यांचा आत्मविश्वास ढळला जातो, “त्या”लाच का हा प्रश्न विचारला जातो.
भक्ती ही बाभुळवनीची वांट कांटा टाळोनी टाका पाय – एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा – हीच ती एक पाउली बाभुळवनीची वांट !!!!
हे सख्य भक्तीचे उदाहरण- येथे शारिरीक व्याधी दूर करण्यास वेळ तरी आहे.
पण तशीच कथा आपण बापू भक्ताच्या आयुष्यात घडतांना पहातो – Doctor  राजीव कर्णिक ह्यांच्या रक्ताच्या कर्करोगाच्या अनुभवात. Doctor च्या पत्नीच्या मनात बापू चरणी भरपूर विश्वास आहे, पण Doctor  राजीव कर्णिक  ह्यांच्या पूर्व संस्कारांमुळे तसा विश्वास नाही, तरीही बापू मदतीला धावुन जातातच. हाच तो अकारण कारुण्याचा महासागर, बापू स्वत: त्यांना साक्षात आल्हादिनी नंदाईंना भेटायला पाठवुन निरोप देतात की तुला हे युद्ध जिंकायचे आहे, योद्धा बनुन fight दे. नंतर पुढे स्वप्नात जाउन बापू स्वत: मोठा झाडू घेउन फुफुत्से साफ करून आत्मविश्वास ही वाढवितात.
एवढेच नव्हे तर पुढे गणपतीच्या वेळी घरी आलेल्या Doctor  राजीव कर्णिकांना प्रेमळ सल्ला देतात की पुस्तकांच्या मधील गोष्टींच्या पुढे जाउन ही काही घडु शकते, जेव्हा ” त्या” ची यंत्रणा कार्यरत होते.
येथे आपण शिकायला हवे कि आमचा आमच्या सदगुरुंवर, बापूंवर किती विश्वास आहे?
आम्हांला विश्वासाची नितांत आवश्यकता आहे. नाही तर बापूंना वर्षाच्या सुरुवातीलाच हा संकल्प घालुन द्यावा लागलाच नसता – एक विश्वास असावा पुरता , कर्ता हर्ता गुरु (बापू )ऐसा.
श्रीसाईसच्चरित आणि बापू भक्तांचे अनुभवातील साधर्म्य , सारखेपणा हेच शिकवितो कि बापू चरणी विश्वास घट्ट करु या , शेंडी तुटो वा पारंबी बापू तुला आम्ही कधीच विसरणार नाही, आमचा हा विश्वास बापू चरणी अढळ राहो हीच माय चण्डिकेच्या चरणी प्रार्थना !!!   माझ्या हातुन कधीही बापूंना का हा प्रश्न विचारला जाउ नये एवढी तरी काळजी मी नक्कीच घेउ शकतो, माझ्या देवाला, माझ्या सद्गुरुरायाला कधी मी त्यांच्या वर अविश्वास दाखवितो हे त्यांच्या काळजाला घरे पाडणारे वर्तन घडू नये ह्यासाठी हे नंदाई तुच आम्हांला जागृत ठेव आणि सावधपणाची मूर्तिमंत आकृती असणार्य़ा सुचितदादांनी आम्हांला वेळीच सावध करावे हीच परमात्मत्रयीच्या चरणी विनंती …
मनापासून कोटी कोटी श्रीराम दादा , ह्या अनोख्या मार्गाने बापू चरणांशी आमची नाळ दृढ करण्यासाठी…