Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-belief in Baba’s words

#1490

belief in Baba’s words

एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा | ही ओवी वाचयला जितकी सोपी तितकीच आचरणात आणायला अवघड आहे.ही ओवी आपल्यासारख्या प्रत्येक श्रद्धावानाला प्रेरक  ठरते.इथे माधवराव देशपांडे यांची विंचू दंशाची कथा आठवते.या मध्ये ‘चाल निघ जा खाली उतार’  हे बाबांचे शब्द पण आपल्या हिताचे आहेत ह्या विश्वासाने त्यांनी त्या शब्दांचे पालन केले. इतक्या वेदनेत  पण त्यांनी असे प्रशा विचरले नाहीत की “बाबा मला असे का बोलले? मी तर बाबांचा भक्त असून पण मला जवळ घेण्या ऐवजी माझ्यावर कृपा करण्या ऐवजी मला असे का दूर बसवले व माझ्यावर ओरडले?” हे विचार येणा म्हणजेच मी माझ्यात व माझ्या सद्गुरू मध्ये मोठ्या भिंती बंध्ण्यासारखा आहे.माझ्या पण आयुष्यात विंचू दंशारूपी अडचणी या येताच असतात.त्या विंच दंशारूपी अडचणीमुळे मला वेदना ह्या होताच असतात.त्या वेळी नेमका माझ्या मनात “बापू लक्ष आहे का?” असा प्रश्न निर्माण होतो.म्हणजेच माझा विश्वास दोलायमान होतो.मला शाम्याच्या कथेतून हेच शिक्याला मिळते की त्या सद्गुरूची कुठलीही  क्रिया,शब्द हे फक्त आपल्या भल्यासाठीच आहे.मला फक्त  माझ्या बापूंवर पूर्ण विश्वास ठेवता आला पाहिजे.

 हा विश्वास वाढवा,त्या करिता मला माझ्या प्रयासना नामस्मरण,नियमित उपासना आणि गुणसंकीर्तन याची जोड दिली पाहिजे.आपण कोणी  संत नाही.आपल्या मनात विचारांरूपी सागर लाटा येतच असतात पण या विचारांरूपी लाटांना पण हे गुनासंकीर्तानाचे श्रवण ,उपासना व नामस्मरण थोपवू  शकतात.ह्या गोष्टी करताना मला  अपोआप सद्गुरू बद्दल प्रेम वाटू लागते व त्यांच्यावरचा  विश्वास  बळावतो.गुणसंकीर्तन करणं किवा ऐकण्याने माझ्या मनातील हा विश्वास वाढतो आणि मग मला कसलीच काळजी  उरत नाही,अशक्य चे शक्य पण माझा बापू करतो फक्त या विश्वासापोटी,प्रेमापोटी.आपल्याला ह्या सद्गुरू वर ठेवायची तो फक्त निस्सीम भक्ती भाव!बाकी त्यांना आपल्या कडून काहीच अपेक्षित नाही.”आमचे बापू आमच्यासाठी हळू हळू सगळे काही नीट करत आहे”,हे पूर्ण विश्वासाने म्हंटले असता काहीही अशक्य उरत नाही हे बापूनी प्रवचनातून सांगितले आहेच.मला संकटातून वाचवणारे फक्त माझे बापूच आहेत.संकट कितीही मोठे असले तरी माझे बापू त्याच्या पेक्षा मोठे आहेत हाच विश्वास महत्वाचा!नानासाहेब चान्दोर्कारांची मुलगी प्रसूत होत असताना तिला खूप त्रास होत होता.पण त्यांचा ठाम विश्वास होता की साई  बाबा आहेत व तेच या संकटातून आपली सुटका करतील व म्हणूनच बाबांनी ती उदी त्यांच्या पर्यंत पोचवली.
” साई साई नित्य म्हणाल सात समुद्र करीन न्याहाल| या बोला विश्वास ठेवाल | पावाल कल्याण निश्चये | “
माझ्या बापुना पण माझ्याकडून हेच अपेक्षित आहे….एक विश्वास असावा पुरता..ही ओवीच माझ्या ऑस्याचे ध्येय बनायला हवे कारण माझ्या बापुना फक्त हेच हवाय म्हणून!
हरी ओम
वेदश्री टाकळकर
पुणे