Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru-Baba’s compassion

#1501

anant Gonbare
Participant

हरि ॐ दादा, तुमची पोस्ट वाचली….. आणि फ्लॅशबॅकमध्ये(Flashback) जावे तसे ८-९ वर्षापूर्वीचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले……बापू कृपेने त्यांचा सहवास तर लाभला होता…. पण मनात त्यांच्याबद्दल जो विश्‍वास दृढ व्हायला हवा तो काही झालेला नव्हता.. त्यावेळेस बापूंचे अनुभव जुन्या भक्तांकडून ऐकण्यास मिळत असत.. त्यातच आपल्या प्रविणसिंह वाघ यांचा अनुभव ऐकण्यास मिळाला होता…. आणि बापूंनी त्यांची पिशाच्चापासून केलेली सुटका आणि ती ही हॅपीहोम मध्ये काही श्रद्धावानांसमोर मिटींगमध्ये उपस्थित असताना…… एखाद्या नवीन भक्ताला ही गोष्ट पचनी पडण्यास कदाचित अवघड जाईल….पण मीे मात्र त्यावेळेस बापूच्या या अकारण कारुण्यामुळे (compassion)भारावून गेलो होतो….. त्याचे कारण असे….. हा अनुभव ऐकण्याच्या काही दिवस आधीच माझ्या वाचनात श्रीसाईसच्चरितातील ‘उपोद्धात’ या सदराअंतर्गत काशिराम शिंपी या साईनाथांच्या परम भक्ताची एक कथा वाचनात आली (पान नं ३ ते ६)… ह्या कथेमध्ये या भक्तावर काही लुटारूंनी तलवार, कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला होता…. बाबांवर असलेल्या अतुट विश्‍वासामुळे हे भक्त त्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले होते….. जेव्हा काशीराम यांची चोरांशी झटापट चालली होती  तेव्हा बाबांनी शिर्डीत आकांत करून सोडला होता…. एकसारख्या शिव्या, बोंबा मारणे व इतर क्षोभाचे प्रकार बाबांनी चालू केले होते…जवळ असलेल्या मंडळींनी ताबडतोब ओळखले होते की, कोणत्यातरी प्रिय भक्तावर अतिमहासंकट आले आहे.. व हा सगळा आकांत त्या संकटातून भक्ताचे रक्षण करण्यासाठीच आहे आणि तसाच प्रकार झाला. चोर हत्यारबंद असताना काशिरामने जिवंत सुटणे कोणालाही शक्य वाटले नसते; पण तारणार्‍यापुढे मारणार्‍याचे काय चालते……. अगदी हीच स्थिती मला प्रविणसिंहांच्या अनुभवामध्ये जाणवली… प्रविणसिंहांवर आलेले संकट (अतिमहासंकट)….. हॅपीहोममध्ये मिटींगमध्ये बसलेले बापू … बापूंनी केलेला तांडव….आपल्या हातातील भिरकावलेली साखळी  मला काशिराम शिंपींचीच आठवण करुन देत होती……  आजही साईसच्चरित हाती घेतले की उपोद्धात वाचले जात नाही पण बाबांवर अतुट विश्‍वास असणारे काशिराम शिंपी आणि परमपूज्य बापूंवर अतुट विश्‍वास असणारे श्री प्रविणसिंह वाघ डोळ्यासमोर आल्यावाचून राहत नाहीत….. आणि इथेच खरंतरं बापूंवरील विश्‍वासाची मूहूर्तमेढ माझ्या आयुष्यात रोवली गेली हे मी ठामपणे सांगू शकतो….. आणि पुढे बापूंवरील विश्‍वास वाढला की नाही हे बापूच सांगतील….. पण दादा तुमच्या ह्या फोरमच्या निमित्ताने मला माझ्या आयुष्यात खर्‍या अर्थाने शिरलेला बापू तुमच्यासमोर मांडता आला…. ही सुद्धा त्याचीच इच्छा…. दादा तुमचे शतश: आभार….. बापू, आई, दादा आय लव्ह यू…… श्रीराम……