Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru Aniruddha Bapu Videos

#1499
श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत. अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेक अनुभव कृपासिंधुमध्येही येतात. त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” (Aniruddha Bapu Videos) युट्युब You tube channel चॅनलवर देखील पहायला मिळतात. हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर असतातच शिवायसद्‌गुरुचरणी श्रध्दा आणि सबुरी दृढ करणारेही असतात.
ही श्रध्दा व सबुरी म्हणजे धैर्यशीलता, भक्तांच्या दृढ झालेल्या भक्तीचे प्रतीक असते. श्रीसाईसच्‍चरिताच्या अभ्यास करताना आपल्या लक्षात येते की साईभक्त डॉ. पिल्लई यांचा नारू सद्‌गुरू साईनाथांच्या कृपेने बरा होणे व बापूभक्त डॉ. राजीव कर्णिकांचा फुप्फुसाचा कर्करोग सद्‌गुरू बापूंच्या कृपेना बरा होणे यात साम्य आहे. तसेच श्री साईसच्‍चरितातील लोहारणीच्या पोराला सद्‌गुरू साईनाथांनी आगीच्या भट्टीत हात घालून वाचविणे व बापूभक्त श्रीमती अनिमावीरा शेट्‍टीगार यांचा मुलगा ३र्‍या मजल्यावरुन पडूनसुध्दा सद्‌गुरु बापूंच्या कृपेने काहीही इजा न होता सुखरुपपणे वाचणे यात देखील साम्य आहे. श्रीसाईसच्‍चरितातील साईभक्त श्री. बाळासाहेब मिरीकर यांना सद्‌गुरु साईनाथांनी पूर्वसांकेतिक सूचना देऊन संर्पदंशापासून वाचविणे व बापूभक्त श्री. अंकुशसिंह चौधरी यांना त्यांच्या थायलंड दौर्‍यादरम्यान पाण्यापासून लांब राहण्याची पूर्वसांकेतिक सूचना देऊन बापूंनी नौका अपघातातून वाचविणे यातसुध्दा साम्य वाटते.
या आपल्या फोरममध्ये माझी अपेक्षा अशी की आता आपण साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, “एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा” हे तत्व सुस्पष्ट करुया.