Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru

#1518

Suneeta Karande
Participant
The Importance of Having Complete Faith in the Sadguru
हरि ओम. साक्षीवीरा बेनखळे ह्या मस्कतला रहाणार्‍या श्रद्धावान स्त्री भक्ताच्या लहान मुलीच्या जीवावर बेतलेले प्राणघातक संकट बापूंनी कसे निवारण केले –
साक्षात परमात्म्याचे बोलच ते , मग भले कोणत्याही काळातले का असेना,  ते अमोघ असतात, सत्यच ठरतात कारण ते असते एक चिरंतन सत्य, त्रिकालाबाधित सत्य.
आपण श्रीसाईसच्चरितात ४० व्या अध्यायांत श्रीसाईनाथांच्या मुखीचे हे बोल वाचतो – म्हणती “जया माझे स्मरण निरंतर । निरंतर आठवण मज त्याची ।।३१ ।। मज न लागे गाडीघोडी । विमान अथवा आगिनगाडी । हांक मारी जो मज आवडी । प्रकटें मी ते घडी अविलंबे ।। ३२ ।। खरे तर, बोल कसले ती असते आपल्या श्रद्धावान भक्ताला दिलेली ग्वाहीच ,वचनच ! साक्षीवीरांच्या मुलीसाठी अविलंबे धावत गेले ते माझे साईबापूच …..
परंतु ते चंचल मानवी मनच , ते संकट समयी स्मर्तुगामी बनुन धावत येणार्‍या करुणाघन गुरुमाऊलीला ओळखु शकत नाही. “दत्त” म्हणजे देऊन टाकलेला असा तो – माय चण्डिकेने तिच्या लेकरांसाठी ज्या तिच्या धाकट्या पुत्राला देउन टाकले असा तो -अनिरुद्ध गतीने धावत येणारा – त्याचे वचन पाळ्ण्यासाठी तो काळाच्या सीमांनाही ओलांडुन धाव घेतोच घेतो.
साईनाथ स्वत:च २८ व्या अध्यायात मेघाला हेच समजावितात कि ” दृष्टांत म्हणूनि माझे बोल ।जातां काय कराया तोल। बोल माझे अर्थ सखोल । नाहीं फोल अक्षरही” ।। १९७ ।। खरेच सदगुरुचे शब्दच काय अक्षरही फोल नसतें.
आपण पहातो कि साक्षीवीरा बेनखळे ह्या मस्कतला राहतात. प्रमुख सेवक सुधीरसिंह नाईक घरी नसल्यामुळे  बापूंना भेटायला नाही मिळाले, दर्शन घेता आले नाही म्हणुन नाराज झालेल्या साक्षीवीरा आणि त्यांना प्रेमाने ग्वाही देणारे त्यांचे पती कि बापू सगळीकडे असतातच. हाच तो एक विश्वास !!!
आणि मग तो येतोच हे पटविण्या ” माझिया प्रवेशा नलगे दार । नाहीं मज आकार ना विस्तार । वसें निरंतर सर्वत्र ।। १९९ ।। होय, श्री. बेनखळेंचा विश्वास सार्थ करण्यासाठी बापू धावुन आला , हे पटविण्या आला कि मी सगळीकडे असतोच. टाकूनियां मजवरी भार । मीनला जो मज साचार । तयाचे सर्व शरीरव्यापार । मी सूत्रधार चालवीं ।। २०० ।। होय, प्राण गेले असे वाटत असतांनाही , पावणे दोन वर्षाच्या लहानुशा मुलीच्या मृतवत भासणार्‍या देहात फक्त सदगुरुच संजीवनी देउन प्राण परत फुंकु शकतो , कारण “तो एकच” जो माझ्या शरीराचा व्यापार चालवणारा सूत्रधार असतो म्हणूनच !!!
पावलोपावली आम्हां भक्तांच्या हांकेला साता समुद्रां पार ही धाव घेणारा माझा बापूराया … माझा अनिरुद्ध प्रेमळा । त्याला माझिया कळवळा । पुढे कसे आकस्मिक रित्यां श्री बेनखळेंना सकाळी जातांना पाहिलेले हॉस्पिटल योग्य वेळी आठवते – श्रीरामरसायन ग्रंथात आपण वाचतो कि गुरुतत्त्वाची रचना ही अशीच नेहमी संकटाआधीच सहाय्याची योजना करणारी असते – हीच त्याची साक्ष !!! आणि मग “त्याचा हस्त शिरावरी । आता उरेल कैची भीती । हया आद्यपिपांच्या शब्दांची जिवंत प्रचिती , अनुभव !!!!
३४व्या अध्यायांत इराण्याची लहान तान्ह्या मुलीला आंकडी येउन ती शरीराची धनुकली होउन बेशुद्ध
पडत असे आणि त्यावर काही इलाज चालत नसे , तेव्हा बाबांची उदी काम करते. येथे तर साक्षात तो
अकारण कारुण्याचा महासागर ओळंबला आणि स्वत:च दर्शन रुपाची आणि अभय हस्ताची संजीवनी उदी घेउन प्रकटला अनिरुद्ध गतीने अनिरुद्ध बनुन ….
दादा साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, “एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा” हे तत्व सुस्पष्ट करण्यासाठी जी वाट आपण दाविली ती बापूचरणांवरचा विश्वास असाच सदा दृढ करो हीच बापूचरणीं प्रार्थना !!!!
श्रीराम.