Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru

Forums Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru

#1483

Suneeta Karande
Participant
हरि ओम दादा.
ह्या वेळेला तुम्ही discussion साठी दिलेला विषय खुपच सुंदर आहे. The Importance of Having Complete Faith in the Sadguru (“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”) सदगुरु चरणांशी संपूर्ण श्रद्धा , अनन्य भावाचे, एकनिष्ठ होण्याचे महत्त्व. परम पूज्य बापूंनी ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रथमच आम्हां सर्व श्रद्धावानांना एक अत्यंत ऊचित संकल्प दिला -“एक विश्‍वास असावा पूर्ता, करता, हरता गुरु ऎसा”. सदगुरुतत्वालाच आपल्या लेकरांचा मनापासून कळवळा असतो, त्यांच्या कल्याणाची चिंता असते,आणि तोच खरा एकमेव आपल्याला कधीही दगा न देणारा, सहज, अगदी अनंत जन्मांमध्येही प्रत्येक पावलावर साथ देणारा एकमेवाद्वितीय असा आधार असतो. पण हे मनाला पटण्यासाठी सदगुरु चरणी दृढ श्रद्धा, विश्वास असावा लागतो. श्रीसाईसच्चरितातील २३व्या अध्यायातील साईंच्या परम भक्त काका दीक्षितांच्या मुखीचे हे बोल त्याचीच साक्ष पटवितात –
बाबा आपुलें अमृतवचन।धर्मशासन ते आम्हां।। १७०।।
आम्ही नेणूं दुजा धर्म।आम्हां नाहीं लाज शरम।। गुरुवचनपालन हेंच वर्म। हाच आगम आम्हांतें।।१७१ ।।
किती खरें आहेत काकांचे हे बोल, आज बापूंमुळेच खरा धर्म आम्हांला कळला, नको त्या पूर्वापार चुकीच्या रुढी, अवास्तव कल्पना, खोट्या अंधश्रद्धा ह्यांच्या दलदलीतून आज बापूंनी बाहेर काढले आणि खरा धर्म शिकविला, मनावर रुजविला. सामान्य जीव तर अध्यात्माच्या पासून दूर , दूर पळतो  ते अवजड शब्दांच्या, कठीण संकल्पनानी हे जाणुन बापूंनी किती सोप्या,सहज भाषेत अध्यात्म शिकविले. वेद, उपनिषदे, ग्रंथ , पुराणे हे न वाचताही आज केवळ बापूंच्याच प्रवचनामुळे ह्या अगणित गोष्टींचे भांडार आम्हांसाठी मोकळे झाले, मग आमच्या लाडक्या बापूंचेच शब्द, वचन हेच आमच्यासाठी धर्मशासन आणि बापूंचे बोल हाच आमचा वेद झाला , तर त्यात नवल ते कोणते?
आम्ही बापूंच्या सर्व वचनांना तंतोतंत नाहे पाळू शकत , कोठेतरी चुका ह्या घडतात , तरी बापूच आम्हां लेकरांचा टवाळूपणा ही आईच्या मायेने पोटात घालून आम्हांला बोट धरुन पुढे नेतात.
म्हणुनच आम्हां तो एकचि ठावें । आपुले नाम नित्य आठवावें ।  स्वरुप नयनीं साठवावें । हे लक्षात घेउन प्रत्येक भक्ताने त्याच्या चरणांशी स्वत:ला घट्ट बांधण्याचा प्रयास करावा , शेवटी बांधून ठेवणाराही तोच आहे आणि त्याने शब्द दिला आहे की मी तुम्हांला कधीच टाकणार नाही. म्हणजे आता विश्वास ठेवणे हेच आणि तोही अढळ विश्वास हे आपलेच काम आहे, ही श्रद्धा , हा विश्वास बापूराया तुझ्या चरणी दृढ होवो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !
दादा , तुम्ही बापूंच्या आवाजातले recording  उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनंत श्रीराम ! बापूंचे बोल ऐकले की मनाला नव्याने उभारी मिळते, जोश संचारतो की माझा देव , माझा सदगुरु बापू माझ्या प्रत्येक पावलावर  माझ्या बरोबर उभा आहेच, आणि हे बापूंचे बोलच तो एक विश्वास अजुन अजुन दृढ आणि दृढ करतात की YES  , काही झाले अख्खे जग जरी विरोधात गेले तरी माझा आणि फक्त माझा बापूच माझ्याबरोबर सदैव होता, आहे आणि असणारच आहे, ह्याच नव्हे तर प्रत्येक जन्मातच!!!!
श्रीराम.