Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#796

Suneeta Karande
Participant

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

हरि ओम. आशावीरा आपण मेघाच्या सर्व कथा एकत्रितपणे संग्रहीत करुन दिल्यात आणि त्यातून कसा बोध घ्यायचा ह्याबद्दल अत्यंत सुंदर विवेचनही केले आहेत. दादा , खरोखरच ही सुवर्ण संधीच तुम्ही आम्हां सर्वांना मिळवून दिली आहेत , श्रीसाईसच्चरिताचा संपूर्ण अभ्यास करण्याकरीतां.
मेघाच्या कथेत एक गोष्ट आढळते ती म्हणजे सदगुरु तत्व कसे भक्ताला परमार्थ मार्गावर दृढ करते ते – हेमाडपंत ३२ व्या अध्यायांत सांगतात – तैंसेच जया परमार्थी आवड । कैसा करावा अभ्यास दृढ । करावें कैसें साहस अवघड । साधाया जोड नित्याची ।। ११ ।।
मेघाला शंकराची आवड होती , पण निर्गुणाकडुन सगुणाकडे प्रवास घडविल्याखेरीज भक्तीची अवीट गोडी , त्यातील माधुर्य चाखता येणार नाही, म्हणुनच बाबा ही आटाटी करतात. बाबा हाच आपला शिव-शंकर आहे ही खूण पट्वून देतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करवून घेउन नित्याची म्हणजेच साक्षात परमात्म्याची साईंची जोड बाबा स्वत:च घालून देतात.
पण त्याआधी भक्तीचा देवयानपंथावरचा प्रवास सुकर करण्यासाठी मेघाच्या मनातील विकल्पाचे दल ही विलग करतात. बापूंनीच शिकविलेल्या आपल्या संपूर्ण जीवनविकास ह्या पंचमीच्या अभ्यासात हे गुपित उलगडते की सदगुरुकृपेंमुळे जोवर हे विकल्पाचे दल उमलत नाही तोपर्यंत अंतिम वाढ होत नाही. जेव्हा सद्गगुरुकृपेमुळे ह्याचे विभाजन होते , तेव्हां सदगुरुवचनामुळे आपल्या विकल्पाचे संकल्पात रुपांतर होते. ती भक्ती विकल्पापासून मुक्त होते आणि मगच सदगुरुकृपेचा अंकुर वाढू लागतो.
मेघाच्या मनांत साई यवन (मुसलमान), मग त्यांचे गुरुत्व कसे घ्यायचे हा विकल्प असतो. म्हणुनच साईनाथ त्याला राव्बहादुर साठे ह्या त्याच्या अनियत गुरुंकडुनच शिरडीला खेचुन आणतों, जसे चिडीच्या पायांला दोर लावून खेचावे तसेच. परंतु बाबा अंतरी दयेचा पूर वाहात असतानांही, रुद्ररूप दाखवून हा विकल्प लागलीच दूर करतात …. साईनामाची गोडी मला लाविली हो किती दयाळू गुरु माझी माऊली हो अशीच स्थिती मेघाची होते त्याला काही कळण्याआधींच.
जणु स्वतंच्या स्वानुभवाचे वर्णन करताना हेमाडपंत मेघाचीच नव्हे तर जणु सदगुरुबद्द्ल शंकीत मनाने ग्रासलेल्या प्रत्येक जीवाचीच व्यथा वर्णितात अध्याय २ मध्ये –
साईदर्शनलाभ घडला । माझिया मनींचा विकल्प झडला । वरी साईसमागम घडला । परम प्रकटला आनंद ।। १४४ ।।
साईदर्शनीं हीच नवाई। दर्शनें वृत्तीसी पालट होई। पूर्वकर्माची मावळे सई। वीट विषयी हळूहळू ।। १४५।।
पूर्वजन्मींचा पापसंचय । कृपावलोकनें झाला क्षय । आशा उपजली आनंद अक्षय । करितील पाय
साईंचे ।। १४६।।
मेघाच्या मनाचा विकल्प झडला, तरी आनंद प्रकटला नव्हता, पण तरीही त्याच साई माउलीने तो परत खेडा ह्या आपल्या गावी जाउन ज्वराने आजारी होवून अंथरुणावर खिळला असता अनिरुद्ध गतीने जाउन परत स्वत:च्या चरणांची आस मनी प्रकटविली, ज्यामुळेच मेघा परत शिरडीकडे त्याच्याच चरणी खेचला गेला ना?
एवढेच नव्हे तर मेघाच्या जीवनांत ,बापूंनी लिहिलेल्या मातृवात्सल्यविंदानं मध्ये सांगितलेल्या तृतीय अध्यायातील गायत्रीमंत्रमहिमा ही आढळतो. साठ्यांनी शिकविल्यावर मेघा गायत्री मंत्र म्हणत होता, त्या आदिमातेच्या कृपेमुळेच तिचीच ५ मुखें , मेघा ह्या तिच्या गायत्रीस्वरुप उपासकाला गायत्रीमाता स्वत: तिच्या प्रत्येक मुखाद्वारे प्रथम आस्तिक्यबुद्धी (आस्तिकता अर्थात साई हा परमेश्वर आहे ही श्रद्धावानाची जाणीव ), नंतर शुद्धता (सदगुरु साईंबद्दलचा विकल्प त्याच्याच शिवतत्वाकडून लय करवून) , पवित्रता, समाधि अवस्था (साई आणि शंकर ही दोन वेगळे रुपे नाही ) आणि ब्रम्हविद्या (साई हाच परमात्मा, परमशिव होय) देवून आणि ह्या पाच तत्वांची पूर्णता करवून घेउन त्यास ब्रम्हानंद देते हे ही दिसते.
मेघाच्या ह्याच कथेत बापूंनी लिहिलेल्या मातृवात्सल्यविंदानम मधील १३ व्या अध्यायांतील चण्डिकामातेची म्हणजेच आपल्या मोठ्ठ्या आईची तीनही स्तरांवर घडणारी लीला सुद्धा दृगोचर होते –
गायत्रीरुपाने ही परमेश्वरी चण्डिका ञानाचा अभाव करणारे कारण म्हणजेच ’आवरण ’ अर्थात सत्याचे झकलेपण दूर करते. साईबाबा म्हणजे केवळ मानवी रुपातील यवन किंवा मुसलमान गुरु नसून “तो” साक्षात परमात्मा आहे हे सत्य दावते.
महिषासुरमर्दिनीरुपाने ही परमेश्वरी चण्डिका शुभाचा अभाव करणारे कारण म्हणजेच ’ दुर्मल ’ अर्थात पावित्र्याचा संकोच , पावित्र्याची बंधित अवस्था दूर करते व त्यासाठी रणमाता अर्थात अपत्यसंरक्षक आक्रमक माता (स्वंयम साईंनी प्रळयरुद्राचे रुप धारण करुन मेघाला प्रथम भेटींत घाबरविणे) बनतें.
अनसूयारुपाने ही परमेश्वरी चण्डिका भक्तीचा व श्रद्धेचा अभाव करणारे कारण म्हणजेच ’ विकल्प ’ आणि ’ विक्षेप ’ दूर करते आणि त्यासाठी अपत्यावर उचित संस्कार करणारी वत्सल माता बनतें.
आमच्या लाडक्या बापूरायानेंही आम्हां नर्मदेतल्या गोट्यांसाठी एक तपावर प्रवचन करुन असेच सतत अविरत प्रयास केले आणि आम्हांला साईचरित्राची गोडी लावली, अंधश्रद्धांची , कुशंकाची पाळेमुळे खणुन काढली, विकल्पांचा राब जाळोन टाकला, तण काढुन टाकले आणि त्याच्याच भक्तीचे बीज रोवले.
समीरदादा , आज तुमच्यामुळे ह्या बापूमाऊलींच्या अनंत ऋणांचे स्मरण अहोरात्र घडु शकते, बाबांच्या कथा न्याहळताना, साईरुप लेवून आधी विनटलेला हा आमचाच अनिरुद्ध बापू , त्याची भक्ताधीनता, भक्तवत्सलता, त्याचे अचिंत्यदान सारे काही सुस्पष्ट्पणे डोळ्यांसमोर उभे ठाकते.
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो !!!!!!!
श्रीराम !!!!!!!