Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#798

Suneeta Karande
Participant

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

हरि ओम. मेघा ह्या निष्ठावान भक्ताचा भक्तिमार्गावरील प्रवास बघत आपण पुढे चाललो आहे. आपण पंचमीच्या परिक्षेत भूत-छाया परिक्षा हे practical अभ्यासतो. त्यात आपण शिकतो की प्रकाशाच्या स्त्रोताला एखादी वस्तु (अपारदर्शक) अड्थळा करते तेव्हा त्या वस्तूची सावली प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला पडते. मेघाने साठ्यांकडून बाबांची जात विचारून घेतली आणि ते मशिदीत रहातात म्हणुन अविंध म्हणजे मुसलमान असावे असा विचार करून स्वत:चे मन कलुषित करुन घेतले. मेघाने येथे सत्य न पहाता, जे दिसते तेच सत्य मानले, हाच सत्याचा आभास होय. त्यामुळे बाबांना भेट्ण्याआधीच त्याने बाबांविषयी आपले मन पूर्वग्रह्दुषित केले, म्हणुन त्याच्याकडुन सत्याऐवजी सत्याच्या आभासाची तुलना केली गेली.या सदभक्ताची अंत:स्थिती जाणुन साईनाथांनी वेळीच त्याला सावध केले , तेही प्रचिती देउन , त्याच्या मनीचे प्रतिध्वनी ऐकवून की सदगुरुपासुन भक्ताचे काही लपून रहातच नाही, मग भले तो “त्याच्या” पासून कोसो दूर का असेना. बाबा किती लहान, लहान गोष्टींमधून आपल्या वाट चुकलेल्या, भरकटलेल्या भक्ताला ही अनुग्रह देतातच – अनुग्रह चा एक अर्थ बापूंनी सांगितला होता आहे तसे स्विकारणे, आहे त्या परिस्थित स्विकारणे, हे फक्त सदगुरुच करु शकतो. बाबा ह्या लहान दिसणार्या गोष्टीतुन सबूरी आणि निष्ठा यांत केवढा मोठा परमार्थ साठला आहे ह्याची शिकवण देतात आणि हे महान तत्व मनावर कोरतात की श्रद्धा आणि भक्तीची पाऊले चालताना सबुरीच विशिष्ट अंतर अत्यंत आवश्यक आहे. नाही तर एकतर ती पाऊले दमतील, थकतील वा चुकीच्या मार्गाने जातील.
श्रद्धेनेच श्रद्धा वाढवत ,सबुरीनेच सबुरी वाढवत श्रेष्ठातील श्रेष्ठ श्रेयस प्राप्त करुन घ्यावे, हाच सर्वश्रेष्ठ अनुग्रह व उपदेश आहे, भले प्रत्येक भक्तासाठी ह्या उपदेशाची पद्ध्त वेगळी वेगळी असू शकते.
माझ्या देवाने, बापूंनी पण असेच हाताचे बोट अलगद धरून आम्हां नाठाळांना भक्तीच्या मार्गावर खेचले आणि आमचा बापू आमच्यासाठी हळूहळू सर्व काही नीट करत आहे ह्याचा विश्वास जागवित पंचशील परिक्षेची गोडी लावली. माझी बाळे टवाळ आहेत, उनाड आहेत, अभ्यास करत नाही हे जाणुन बापूरायाने फक्त १० अध्यायांची एक परिक्षा अशा ५ परिक्षा ठेवल्या. अख्खे श्रीसाईसच्चरित काही पचनी पडायचे नाही हे मर्म तो जाणतो, म्हणुनच शेवटच्या परिक्षेसाठी संपूर्ण ५२ अध्याय ठेवले. साईनामाची गोडी मला लाविली हो, किती दयाळू बापू माझी माऊली हो!!!!!
वानु किती रे सखया बापुराया दीनवत्सला !!!
मनाच्या शंका-कुशंकाच्या गोंधळात सावल्या मोठ्या दिसतात, शिवाय इषणारुपी वार्याने सतत ज्योत हालत असते. त्यामुळे सावल्या सतत हलताना दिसतात व माझ्या मनात संभ्रम निअर्माण होतो गुरुविषयीच, पण हा भक्तवत्सल हे जाणुन मला उचित वेळीच बाळकडु पाजतो. ज्या क्षणी मी माझ्या अखिल इच्छा, वासना , काळजी , भय ह्यांचे गाठोडे सदगुरु चरणी समर्पित करतो, त्या क्षणी हा हलणारा आणि ज्योतीसकट माझ्या मनाला ही द्विधावस्थेत हालवणारा वारा शांत होतो. जिथे सावल्यांच पूर्णपणे विरुन जातात व समान अधिपती म्हणजेच सर्वांना समानपणे बघण्याची कला जी “समाधि” ती भक्ताला अवगत होते. परंतु यासाठी प्रथम “सर्वेषणाविनिर्मुक्त” म्हणजे वासना-विकारांना भगवंताचरणी अर्पण करणे, म्हणजेच कृष्णार्पण करणे आवश्यक आहे.
मेघाच्या कथेत हा प्रवास , त्याच्या मनातले कुतर्क, शंका ह्यांनी तो कसा असतो सुरवातीला, मग हळूहळू साईनाथ कसे त्याचे सर्व विकल्प दूर करतात, आणि मग साईंना हवी तशी एका सच्च्या श्रद्धावान , निष्ठावान भक्ताची परिपूर्ण आकृती “तो” स्वत:च कशी घडवितो हे दिसते.
तीच कनवाळु सर्वांची आई । हांकेसरशी धांवत येई । कळवळूनि कडिये घेई । जाणे सोई लेकरांची ।। ५८ ।। ( अध्याय १३)
आणि आद्यपिपांच्या अभंगाच्या ओळी भावार्थ उलगडवुन दावितात –
बाळपणी नुमजे काही ।
यौवनाची सारी घाई ।
प्रौढपण येता येईना ।
वृध्दत्व आदळे माथा ।
जर संगती बापू असता नसता हा गोंधळ झाला ।।
मेघाच्या जीवनी वेळीच साईंनी प्रवेश केला ,म्हणुन अनर्थ टळला, तसाच माझ्या जीवनी माझा अनिरुद्ध , माझा बापू आहे म्हणुनच कोरड्या चरणी हा भवसागर आम्ही तरुन जाउच ही मनाला, बुध्दिला १०८ % ग्वाही आहे कारण माझा बापू मला कधीच टाकणार नाही हे गुरुवाक्य त्यानेच हृदयी, अंत:करणावर, मनचंक्षुवर कोरले आहे, त्यानेच दर जन्मी पाटी कोरी करण्याचे अभिवचन दिले आहे.
श्रीअनिरुद्धराम !!!!!!!!!