Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#801

Sangita Vartak
Participant

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

हरि ॐ आशावीरा,
तुम्ही साईचरित्रातील मेघाच्या सर्व कथा एकत्रित करुन त्या साध्या सरळ व सोप्या भाषेत मांडल्या….. मस्तच मांडले आहे…. अगदी साईचरित्र खूप वेळा वाचले नसेल त्यांना ही या सर्व कथा व त्यातील मेघा (Megha) आणि बाबांची (गुरू-भक्ताची) रुपरेषाच मांडली आहे….श्रीराम त्यासाठी….
खरचं हे आदर्श आपण सर्वांनी सदैव स्मरणात राहतील असेच आहेत. मेघासारख्या भक्ताने आपल्या भक्तीने आपल्या जीवनात आनंद मिळविला…. जीवनाचा एक उच्चांक गाठला…… मेघाच्या अंतीम समयी त्यांच्या गुरूंच्या जवळ होता…. नुसता जवळच नाही तर त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला…. इतकेच नाही तर त्याच्या निधनाच्यावेळी बाबा म्हणजे त्याचा सदगुरू स्वत: स्मशानात हजर राहून…. स्वत: त्याचा पार्थिव देह फुलांनी आच्छादिले….. दुख: व्यक्त केले… इतकेच नाही तर १३ व्या दिवशी बाबांनी त्याच्या श्राद्धविधी करवून घेतला…..खरचं यासारखे मरण म्हणजे मरण नाही तर सद्‌गुरुंची कृपाच….. खरचं धन्य ते बाबा…. धन्य तो मेघा…. धन्य ती मेघाची भक्ती…
खरचं मेघाची भक्ती आचारणायोग्यc आहे……. आपणही असाच बापूंचा ध्यास लावला पाहिजे…. आपल्या जीवनाचे सार्थक केले पहिजे…… की मग नक्कीच आपले बापू आपल्याला स्वत:भर्गलोकात जल्माला घालण्यासाठी येतील…..
हरी ॐ