Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#803

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

हरी ओम !दादा !श्री साई चारीत्रातली भक्त मेघाची कथा सद्गुरूतत्वाकडे प्रत्येक भक्ताची रांग कशी वेगळी असते आणि सद्गुरू आपल्या चरणांशी
आलेल्या भक्ताला आणखी पुढे नेण्यासाठी कसे वेगवेगळे उपाय आणि प्रयास करतो याचे सुंदर दिग्दर्शन करते .
शंकरावर निस्सीम प्रेम करणारा ,निर्मळ ,शंकरासारखीच भोळी भक्ती करणारा मेघा,ज्यावेळी त्याच्या मनातील बाबांविषयीचा विकल्प दूर होतो त्यावेळेपासूनच बाबा म्हणजे माझा “उमानाथ” म्हणून बाबांवर तेच प्रेम करू लागतो .बाबांवर अनन्य प्रेम करतो .हेमाडपंत लिहितात ,
“साईच त्याचे देवतार्चन ,साईच त्याचा गिरिजारमण ,
येच दृष्टीचा ठाव घालून ,नित्य प्रसन्नमन मेघा ”
असा हा भोळा मेघा ,तेवढ्याच भोळ्या भावानी मकरसंक्रातीला बाबांना स्नान घालू इच्छितो आणि बाबांच्या मस्तकावर गोदावरीच्या पाण्यानी भरलेला घडा संपूर्ण रिकामा करतो आणि बाबांचे फक्त शीर तेव्हढेच ओले होते .जरा आश्चर्यच वाटते नाही का ?फक्त प्रेम आणि प्रेमानीच भरलेला ,आणि प्रेमाच्या फक्त एकाच हाकेलाही ओ देणारा हा सद्गुरू मेघाचे मन का जाणत नाही ?कोस दीड कोस अनवाणी चालत जाऊन पाणी आणून सुद्धा जराही न थकलेला मेघा ,त्याचा भाव का बाबा जाणत नव्हते ?शबरीची उष्टी बोरे खाणारा ,विदुराच्या घरच्या कण्या आवडीने खाणारा ,तर्खड पत्नीने पाठविलेला आधीच निवेदित पेढा खाणारा ,डॉक्टर पंडितांच्या त्रीपुंद्राला भुलणारा हा साई मेघाचे त्याच्यावरील प्रेम का जाणत नव्हता? तसे नाही .सद्गुरू जेन्ह्वा भक्तांच्या उद्धारासाठी ,सगुण साकार रुपात अवतरतो तेंव्हा आपल्या भक्तांचा प्रवास सगुण निराकार रुपाकडे कसा होईल यासाठी प्रयास करतो .आपण साई चरित्रातील भक्तांचे अनुभव वाचले आणि आज आपल्या बापूंचे अनुभव ऐकतो तेंव्हा जाणवते कि या सद्गुरूला आपण कोणत्याच रुपात .आकृतीत,आणि वेशात अडकवू शकत नाही .तो स्वतःला अडकवून घेतो ते फक्त प्रेमाच्या साखळीत .जेन्व्ह्वा कोणी देवाच्या कोणत्याही रुपाची प्रेमळ भक्ती करतो तेन्ह्वा हा सद्गुरू अशा बाळाला आपल्या जवळ खेचून घेतो आणि त्याला परमेश्वराच्या खऱ्या स्वरुपाची ओळख करून देतो ,यालाच आपण सद्गुरूची लीला म्हणतो.
मेघा शंकरभक्त होताच .उत्कृष्ट अर्चन भक्ती होती मेघाकडे . कोणतीही प्रेमळ भक्ती शेवटी चान्डीकाकुलाकडेच पोचते पण या दोघांमधील दुवा म्हणजेच हा सगुण साकार सदगुरू असतो हे बाप्पांनी आपल्याला छान समजून सांगितले आहे .मेघा बाबांना शंकर मानत होता .इथे मला साई चरित्रातील ओवी आठवते ,बाबा मेघाला म्हणतात ,”माझिया प्रवेशा न लगे दार” हे दार म्हणजेच आपण सद्गुरूला दिलेले नाव आणि रूप .असेच दार देव मामलेदारांनी निर्माण केले होते बाबांबद्दल कि बाबा म्हणजे ते फाकीरवेशातीलच .पण बाबांनी त्यानाही या गैरसमजातून बाहेर काढून देव मामलेदारांना भक्तिमार्गात कुठल्याकुठे नेऊन ठेवले .खरोखरच सद्गुरूला अशा तऱ्हेने बंदिस्त करून ठेवणे म्हणजेच चिंध्या गोळा करणे .पण हा प्रेमळा सद्गुरू त्याच्यावर वेडवाकड प्रेम करणाऱ्या श्रद्धावानांना भरजरी शेलाच मिळावा म्हणून प्रयास करत राहतो .बापूंचे श्रम पाहिले कि हेच जाणवते नाही का?बाबांना मेघालाही असाच भरजरी शेला द्यायचा होता
Matareshvarya मध्ये आपण वाचतो कि परमात्म्याच्या १/१०८ अंशापासून शिवात्मे ,ब्रह्मा विष्णू आणि शंकर निर्माण झाले .परमात्मा म्हणजेच प्रजापतीब्रह्मा परमशिव ,आणि महाविष्णू . बाबा म्हणजे परमशिव ! शिव म्हणजे शुद्धता संपूर्ण पावित्र्य शरण मज आला आणि वाया गेला ,हे ज्याचे वचन आहे आणि मी तुला कधीच टाकणार नाही हे वचन देणारा सद्गुरू आपल्या भक्ताची भक्ती जरी १ अंश असेल तरी ती १०८ अंशापर्यंत कशी पोचेल हे पाहत असतो .किंबहुना १अन्श एवढ्या बीजाला अंकुर फुटून त्याचे उन्मीलन कसे होईल यासाठीच हा सद्गुरू प्रयास करतो .बाबांना मेघाला हेच दाखवून द्यायचे होते कि हे असे दार ठेवू नकोस .माझ्या भक्तांच्या समग्र जीवनात शिरण्यासाठी मला कोणत्याही आकृतीची व ठराविक नामाची गरज नसते ,बापू नेहमी सांगतात परमेश्वर हा भावस्वरूप आहे .आणि हा भाव अधिकाधिक शुद्ध होणे म्हणजेच शुचिता ,शिवत्व .म्हणून मेघांनी अत्यंत भावविभोर अवस्थेत बाबांच्या मस्तकावर पाणी ओतूनही बाबांचे फक्त शिरच ओले झाले .
हे दार म्हणजेच तेल्याची भिंत जी पडून टाकण्यासाठ्च सद्गुरू देह धारण करून येतो .हेमाडपंत म्हणतात राम कृष्ण आणि साई ,तिघांमाजी अंतर नाही .हे अंतर जसजसे कमी होते तशी भक्ती १०८ अंशाकडे प्रवास करते हाच खरा शिवात्वाकडे होणारा प्रवास ,गोकुळाकडे होणारा प्रवास नव्हे प्रेमप्रवास !!कधीही न बुडणाऱ्या गोकुळाकडील प्रवास..
हा प्रवास बाबांनी मेघाकडून करून घेतला मेघा नित्य सर्व देवळातील पूजा करून बाबांची पूजा करायला येत असे .एक दिवस एका देवळाचे दर बंद होते .बाबा मेघाला परत पाठवतात .आणि सांगतात जा “आता” दार उघडे आहे .खरेच तसे असते .बापू सांगतात तसेच कि इतर देवांची तुमच्यावर कृपा होते ती त्या परमात्म्याच्याच सद्गुरुच्याच आज्ञेमुळे .,आपल्यावर निर्मळ आणि वेडे प्रेम करणाऱ्या मेघावर बाबांचे अपार प्रेम होतेच .
“तुम ते प्रेम राम के दूना”प्रत्यक्ष सीतामाईला श्री हनुमंत सांगतात ,आपण सुंदरकांड मध्ये वाचतो .
मेघाच्या उत्तरविधानाच्या वेळच्या ओव्या वाचताना आपल्या भक्तांवर निरतिशय माया करणाऱ्या ह्या सद्गुरूचे मातृह्रीदय दिसते.
“मेघा जेंव्हा पावला पंचत्व,पहा बाबांचे उत्तरविधानमहत्व ,
आणिक बाबांचे भक्त सख्यत्व ,मेघा तो कृत कृत्य आधीच .
प्रेमे बाबांनी निजकरे ,प्रेत आच्छादिले सुमननिकरे ,
शोकही करुनी करुणस्वरे ,मग ते माघारे परतले.”
असाच प्रेमळ आहे हा सद्गुरू .बाळानो तुम्हाला मृत्यू नाही ,दोन्हीकडे जन्मच आहे ,आमची सर्व पापे पुसून आमच्या पापांची पाटी कोरी करणारा हा सद्गुरू ,आम्ही सदैव परम शिवाच्या कर्पूर गौर मार्गावरून चालत राहावे म्हणून प्रयास करतो .
मेघाची कथा आम्हाला हेच शिकवते .हरी ओम !