Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#791

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti- devotion
प्रिय पुज्यसमीर दादा ,
खूप छान विचार वाचायला मिळत आहेत. ह्या मेधा च्या
गोष्टीत दशम अध्यायतील नियत गुरू व अनियत गुरू हा विषय नीट समजतो असे मला वाटते राव बहादूर साठे ह्या अनियत गुरुकडून गायत्री मंत्र वगैरे देऊन मेधा ची प्रगती करून घेतली गेली व मेधा ला नियत गुरू साई बाबा पर्यंत नेऊन सोडले गेले. साई बाबा नी पुढील प्रगती साधून दिली. विनायक ठाकूर ह्यांच्या कथेत सुद्धा ही गोष्ट दिसते.
बर्‍याच वेळा आम्हाला प्रश्न असतो की आमचा एक गुरू आहे तर आम्ही दुसर्‍या गुरुकडे कसे जावे?तितक्या ताकदीचा बाबा सारखा गुरू भेटे पर्यंत आमची तयारी अनियात गुरू करून घेतो त्याने सांगितलेले केल्यामुळेच नियात गुरूचे गुणसांकीर्तन आमच्या कानावर येते व त्याच्या कडे जवायची वाट मोकळी होते

शिवाय बाबा एवढी लीला दाखवतात तरी मेधला पूर्ण खात्री कुठे पटते?गावी जाऊन आजारी झा ल्यावर अचानक उपरती होऊन बाबा ची आठवण होऊ लागते .बाबा हेही करुन घेतात . सद्गुरू बुद्धी प्रेरक दाता असतो तो असा.