Reply To: About this forum

#885

KIRAN MADANE
Member

About this forum

हरि ओम पूज्य समीरदादा
साई महिमा वाचला आणि परत एकदा जुनी उपासना पुस्तिका शोधून काढली. नेहमी कुठे ना कुठे वाचला आहे की, नुसते डोळे उघडे ठेवून चालत नाही, नीट निरीक्षण करता आला पाहिजे.
असाच काही झालं आहे, साईमहिमा पाहिला , वाचला आणि सरळ FLSHBACK मध्ये गेलो, किती वर्ष नंतर आज परत एकदा साई महिमा वाचला आणि इतक्या दिवसा पासून मी जे शोधत होतो, ते मला मिळालं. दररोज बापूंची उपासना करताना एक इच्छा नेहेमी बोलतो
“तु जे इच्छिसी तेची घडो l हेची मागता व अवघडो l जीभ माझी ”
आज समझल की नेमकी ही ओवी कुठली आहे ते.
खूप खेदाची गोष्ट आहे, असच काही साई – चरित्रा बाबत घडत आहे. पंचशील झाली आणि साई चरित्र वाचन , पठन बंद झालं आहे.

पण दादांनी सुरु केलेल्या ह्या ब्लोग मधून परत एकदा साई चरित्र वाचनाला सुरवात करेन