Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8805

ketaki. Kulkarni
Participant

खूपच सुंदर… हे साईचरित्र खरोखर किती छान आहे न! बघता बघता किती तरी वेगळ्या वेगळ्या वळणांवरून हि नदी पुढे पुढे वाहत जात आहे. अम्बज्ञ दादा हा platform सर्वांना खुला करून देण्यासाठी!
हर्षसिंहनि एक वेगळ्याच प्रकारे दर्शनाचे महात्म्य सांगितले आहे आणि सुनितावीरानी देखील साइचारीत्रातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीन मधुन दर्शनाचे महत्म्या समजून सांगितले आहे. एका छोट्याशा असणार्या शब्दाचे किती गहन अर्थ ह्यामध्ये दडले आहेत. आणि सगळ्यामधून एकच महत्वाच सार निघत ते म्हणजे विश्वास आणि प्रेम..
जेवढा विश्वास, प्रेम, तेवढा त्या दर्शनाचे लाभ.. ह्याच्या दर्शनाने होतो तो फक्त लाभच.. तोटा तर कधी होऊच शकणार नाही. मग ती दर्शन घेणारी व्यक्ती अगदी पाप्यातील पापी असली तरी तिचाही फायदाच होतो.. विश्वास आणि प्रेम अभावी भले हि त्याला लाभ त्या मनाने कमी होईल पण नुकसान मात्र कधीच नाही…आणि त्याच बरोबर एखादी व्यक्ती जर आधी वाईट असेल पण नंतर जर तिने त्याच दर्शन अतिशय प्रेमाने घेतले तर दसपट फायदा करून द्यायला पण हा बाप्पा मग मागे पुढे बघत नाही… आणि ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे सुंदरकांडातील विभीषण…
आपण बघतो विभीषण स्वतः हनूमंताला सांगतो…

।। तामस तन कछु साधन नाही।
प्रीती न पद सरोज मन माहि।
अब मोहि भा भरोस हनुमंता ।
बिनु हरिकृपा मिलही नहीं संता।।

राक्षस योनीत होता, पण राम बाप्पाच्या दर्शनाची आस, ओढ त्याला त्या रामाकडे हनुमंता through घेऊन गेली आणि ज्या वेळी त्या राजीवलोचन रामाला भेटायला बघतो त्यावेळी त्याला त्याचे आनंदाश्रू थांबवता येत नाहीत… त्याचा तो आनंद किती झाला असेल हे विचार करण्याच्या हि पलीकडच आहे… हनुमंताला पण राम बप्पाने त्याच्याकडे त्याच्या दर्शनाची आस बघुन..
आणि नंतर त्याच फळ हि आपण बघतोच… लंकेचा राजा बनला विभीषण….
हेच त्याच अकारण कारुण्य!
हाच त्याच्या एका दर्शनाने होणारा लाभ!
अजुन काय पुरावे द्यायला पाहिजे ह्या देवाने त्याच्या अस्तित्वाचे…
जे नास्तिक आहेत किवा जे देवाच अस्तित्व नाकारतात, स्वतःभोवती हेच खोक घालून वावरतात की जगामधे देव नाहीच त्याना ह्याचे महत्त्व कधीच नाही समजू शकणार, कारण त्यांचा मी पणा इथे आड आलेला असतो, की जे काही होत ते देवामुळे नाही तर माझ्या मेहनतीमुळे मला मीळालेल आहे, आणि ही भावना एकदा शिरली डोक्यात की मग त्याना कितीही देवाने पुरावे दिले तरी ते पटत नाहित… आणि ह्याच उदहारण म्हणजे रावण!
आता आपल्या देवाची एक झलक जरी दिसली तरी विभीषणासारख आनंदी रहायच की त्याने किती ही आपल्यासाठी झटून सुद्धा त्याला व त्याच्या अस्तित्वाला नाकारायच, त्याच दर्शन होऊन सुद्धा त्याचा लाभ उचलायचा की नाही हे ठरवण आपल्याच हातात आहे!

हे त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे
अंबज्ञ
Ketakiveera kulkarni