Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8707

ketaki. Kulkarni
Participant

हरिओम

दर्शन: दादानि सांगितल त्याप्रमाणे…

बापूही आपल्याला नेहमी सांगतात की सर्वात मोठा चमत्कार कुठला – तर मनाची वृत्ती पालटणं, मनाचं नम: होणं (संदर्भ : श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज, सत्यप्रवेश, चरण ५, पान क्र. २५), आणि हाच सर्वात मोठा चमत्कार होय; जो हेमाडपंतांनी फक्त साईनाथांच्या (सद्-गुरुंच्या) दर्शनाने अनुभवला. हेच ते दर्शन महात्म्य जे कशाचीही अपेक्षा न ठेवता साईनाथांकडे गेलेल्या हेमाडपंतांनी अनुभवलं.

दर्शन हि गोष्ट म्हणायला किवा ऐकायला किती सोप्पी वाटते… पण बघायला गेल तर ह्याचा फार मोठा अर्थ निघतो, आपण अगदी सहज बोलून जातो कि आज मला बापूंच दर्शन झाल…. पण ज्या वेळी त्या बाप्पाच दर्शन आपण घेत असतो त्यावेळी आपल्या मनाची स्थिती कशी असते! आपण त्या क्षणाला अगदी त्याच्या रुपाकडे बघण्यात, त्याला न्याहाळण्यात गुंग होऊन जातो का … तो जो क्षण असतो, तो आपल आयुष्य बदलून टाकणारा क्षण असतो… ह्याचा आपण विचार करतो का….
ज्या प्रमाणे दादांनी ग्रंथराजातली ओळ सांगितली कि चमत्कार म्हणजे काय… तर जे आपल मनच बदलवून टाकतो, एवढा ह्याच्या फक्त एका दर्शनाचा महिमा आहे…
पण हे काधी शक्य होत, जेव्हा आपण तेवढा विश्वास ठेवतो कि मला माझ्या देवच दर्शन आज झाल म्हणजे माझा आजचा दिवस नक्कीच चांगलाच असणार… प्रत्येक वेळेला त्याच दर्शन घेताना मला तेवढाच नाविण्य त्यात वाटला पाहिजे,
त्याच बरोबर जेव्हा आपण त्याला बघतो त्या वेळी त्याने माज्याकडे बघितल नाही म्हणून वाईट न वाटून घेता उलट त्या वेळी पण हा विश्वस दृढ पाहिजे कि माझ्या बापूच माझ्याकडे लक्ष असतच, त्याच त्याच्या प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक बाळाकडे बारीक लक्ष असत, एक हि लेकरू त्याच्या नजरेतून कधी सुटूच शकत नाही… हा विश्वास पाहिजे… कारण बापू म्हणतात त्याप्रमाणे आपण बापूंच दर्शन घ्यायला जातो का त्यांना आपल दर्शन द्यायला जातो हाच विचार करायला पाहिजे…

हेमाडपंतांच अख्खच्या अख्ख आयुष्य फक्त बाबांच्या दर्शनाने बदलून जात… का??
कारण बाबांचं दर्शन घेताना त्या क्षणाला त्याचं मन पुर्णपणे बाबांच्या रुपात आपोआप एकचित्त होऊन गेलेला असत, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठली हि आसक्ती उरतच नाही , त्या क्षणासाठी तरी त्यांच्या मनामध्ये कोणतेच कुतर्क येत नाहीत…
आणि नंतर हळू हळू ते पूर्णच बाबानांमध्ये एकरूप होऊन जातात…
साईचरित्राच्या practical book मध्ये दर्शन practical मध्ये खूप छान बापूंनी समजून सांगितले आहे… कि दर्शन घेताना स्थिती कशी पाहिजे तर मोरासारखी… मोर कसा ढग आल्यावर थुई थुई नाचायला लागतो, त्याचा पिसारा फुलवून…. तसच मला जेव्हा माझा देव भेटतो तेव्हा तसाच मला पण माझ्या मनाचा पिसारा फुलवून माझ्या देवाचे अगदी आनंदाने नाचून स्वागत करायला पाहिजे…
त्याचे स्वर ऐकण्यासाठी कान आसुसले पाहिजे… कारण त्याचे स्वर कानी पडणे हे सुद्धा एकप्रकारचे दर्शनच आहे…
एका अभंगात म्हटल्या प्रमाणे

चातक, चकोर, भुंगा, मयुर
वाट पाहतो मेघाची
तैसी येई तन मन कानी
सूर ऐकाया अनिरुद्ध

त्याच बरोबर आपल्याकडे आपल्या देवाचा photo आहे तो बघताना सुद्धा मला तेवढाच आनंद व्हायला हवा, ते सुद्धा त्याचे दर्शनच असते.
आपण अनिरुद्ध महिमा मध्ये सुद्धा बघतो कि…

।। केवळ एक दृष्टिपात। क्षणात होई पापाघात।
टळेल जन्मांचे दुरित। ढीग जाळीत कुकार्मांचे।।

हे असे आहे ह्या आपल्या बाप्पाच्या दर्शनाचे महत्व… त्याची एकच नजर पुरेशी आहे माझा योगक्षेम वाहण्यासाठी…माझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आण्यासाठी… कि ज्यामुळे मला इतर चाम्ताक्रांसाठी कधीच कुठल्या हि अघोरी मार्गाचा अवलंब करावा लागत नाही व मी कायम त्याच्या मायेच्या पदराखाली निवांत राह्तो….

Just thought of few lines….
बाबा तुमच्या दर्शनाचा महिमा
हेमाडपंतांनी योग्यतेने जाणला
त्यांच्या मनाचे नमः करण्या
मग तुम्ही हि नाही मागे सरलात

बाबा तुमच्या दर्शनाचा महिमा
मीना वैनिनी पुरेपूर अनुभवला
त्यांना सामिप्याची ओढ पुरविण्या
मग तुम्ही हि नाही मागे सरलात

बाबा तुमच्या दर्शनाचा महिमा
पिपा काकांनी बरोबर नेमला
त्यांचे मजबूत घर बांधून देण्या
मग तुम्ही हि नाही मागे सरलात

बाबा तुमच्या दर्शनाचा महिमा
साधना ताईंनी अचूक टिपला
त्यांना तुमच्या प्रेमात नाहावण्या
मग तुम्ही हि नाही मागे सरलात

हे त्रिविकमा! तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे

अम्बज्ञ
Ketakiveera Kulkarni
Dombivli East Upasna Center