Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8699

Harsh Pawar
Participant

हरि ॐ
दादांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी दर्शन महिमेचे वर्णन केले आहे …
दर्शन शब्दा बरोबर आज आठवण झाली “सुदर्शन ” ह्या शब्दाची आणि “सुदर्शन” ह्या शब्दा पासून आठवण झाली “सुदर्शनचक्राची ” ….
The word Sudarshana is derived from two Sanskrit words – Su (सु) meaning “divine” and Darshana (दर्शन) meaning “vision”. Hence, the word Sudarshana collectively means “vision of which is auspicious” ( Source : Wikipedia )

auspicious = मंगल / शुभ ….
असा हा “सुदर्शन ” शब्द “चक्रा” आधी वापरला का गेला असावा ???
“सुदर्शनचक्र ” हे महाविष्णूचे आयुद्ध आहे …परमात्म्याचे / सद्गुरूचे दर्शन हे सुदर्शन आहे आणि अश्या ह्या “सुदर्शन” परमात्म्याने चक्र धारण केल्यामुळे त्या चक्राला “सुदर्शनचक्र” नाव पडलं असावं का ???
आपण मातृवात्सल्यविन्दानम मध्ये वाचतो कि महाविष्णूला हे चक्र महाकाली माते कडून प्राप्त होतं मधु-कैटभांचा नाश करण्यासाठी …(पुढे आदिमातेच्या महालक्ष्मी अवताराच्या वेळी महाविष्णू आदिमातेला हेच सुदर्शनचक्र परत करतो असं ही आपण वाचतो मातृवात्सल्यविन्दानम मध्ये ) … भगवान श्री कृष्ण ही सुदर्शनचक्राचाच उपयोग करतात शिशुपालाला मारण्यासाठी … म्हणजेच चक्राचा वापर परमात्मा दुष्मनांचा बिमोड करण्यासाठी करत असतो , वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी करत असतो , उद्धार करण्यासाठी करत असतो …
सदगुरुंच दर्शन हे नेमकं त्या चकरा प्रमाणेच काम करत असतं … माझ्या मनातील हिंस्र श्वापदांचा बिमोड करत असतं , मनातील वाईट वृत्तींचा नाश होतो सद्गुरु दर्शनामुळे … तर्क-कुतर्क तुटून पडतात सदगुरू दर्शनामुळे …
सदगुरू दर्शनाचा महिमा हेमाडपंत आपल्याला सांगतात

साईदर्शनलाभ घडला| माझिया मनींचा विकल्प झडला|
वरी साईसमागम घडला| परम प्रकटला आनंद|
साईदर्शनीं हीच नवाई|दर्शनें वृत्तीसी पालट होई|
पूर्वकर्माची मावळे सई| वीट विषयीं हळूहळू|
– (श्रीसाईसच्चरित अ.२, ओ.१४४, १४५)

दादांनी खूप सोप्प्या शब्दांमध्ये वर ह्या ओवींचा अर्थ सांगितला आहे … अंबज्ञ दादा !!!

श्री राम
आदिमाते , तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे !!!
~ हर्षसिंह पवार