Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8698

ketaki. Kulkarni
Participant

सपटणेकर काय किवा रतनजी काय.. दोघानाही इच्छित गोष्ट बाबांकडून प्राप्त होते, एकाला मागून तर एकाला न मागता.. पण हे का झाल?? कश्यामुळे बाबांनी केल.. तर त्यांनी बाबांवर संपूर्ण विश्वास ठेवलेला. कुठे हि अस नव्हत कि बाबांनी माझी अमुक अमुक गोष्ट दिली नाही तर मी त्यांच्यापासून लांब जाइल किवा मी त्यांना मानणार नाही.. अस कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही, उलट ते बाबांनी जे दिली किवा जे देतील त्यात समाधान मानत.
हा सद्गुरु खरच असाच असतो. जो कोणी त्याला मनापासून शरण जातो त्यांची सर्व दुख तो दूर करतो. त्याच्या बदल्यात त्याला काही एक नको असत. फक्त आणि फक्त प्रेम, एवढच काय ते त्याला आपल्याकडून अपेक्षित असत.
खरच एवढ प्रेम असत ना ह्याच कि त्याला सीमाच नसते. मला फक्त त्याच व्हायचा आहे कि मग माझा संपूर्ण भार तोच वाहून नेतो..
बाबांच्या ११ वचनांमध्ये बाबा सांगतात

।। माझा जो जाहला काया वाचा मनी
त्याचा मी ऋणी सर्वकाळ ।।

म्हणजे काय बोलाव आता!
सगळी आपली काम हाच करणार, आपल्या सर्व इच्छा हाच पुरवणार, मला काय हव नको हे पण सगळ हाच बघणार, माझा सततचा त्रास पण हाच सहन करणार, अडीअडचणीतून पण हाच बाहेर काढणार, वरून नामा निराळा राहणार हाच आणि एवढं सगळं काही करून सुद्धा ऋणी पण हाच राहणार.. का तर मी फक्त त्याचा पूर्णपणे झालो म्हणून..
बर अस हि नाही कि आम्ही तुझ सगळ काही ऐकतो, तुझ्या आज्ञेच तंतोतंत पालन करतो, उलट हजार चुका रोज करतच असतो पण तरीसुद्धा तू आमच्यावर इतकं प्रेम करावस! उपनिषदामध्ये तुझी सर्व तळमळ दिसून येते, तुझ्या लेकरांसाठी सर्व मार्ग खुले करून ठेवलेस तू.. त्यातून असच वाटत राहत सारख कि जणू काही बाप्पा त्यांच्या बाळांना सांगत आहेत कि,
“कि राजांनो, काही झाल तरी घाबरून जाऊ नका, बिथरून जाऊ नका, ह्या उपनिषदाचा हात पकडा आणि मस्त स्वच्छंदपणे बागडा, कारण ह्या उपनिषदाचा हात पकडला म्हणजेच तुम्ही माझा व मोठ्या आईचाच हात पकडला आहे, आणि असा strong support जवळ असताना कोण तुमच्या केसाला धक्का लावेल हे मी बघतो! तुम्ही निश्चिंत राहा!”

कस काय एवढ प्रेम करू शकतोस रे बापू तू!
Your love for us is just endless, even sky cannot be the limit for your love, its just beyond anyone’s imagination.
बाप्पा आता एवढं तरी आमच्याकडून करून घे, कि तूच दिलेल हे उपनिषद माझ्याकडून नीट आचरणात आणून घे, आणि कमीत कमी क्षमासुगंध प्रार्थनेतील ह्या दोन गोष्टी तरी नीट लक्षात ठेऊन त्याप्रमाणे माझी वागणूक घडू दे..
* निवड तुझ्या हातात आणि त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार माझ्या हातात असू दे.
* मला माझ्यामुळे तुला आनंदित झालेलं बघायचं आहे.

हे त्रिविकमा! तू प्रेमळ आहेस आणि मी अम्बज्ञ आहे

अम्बज्ञ

Ketakiveera Kulkarni
Dombivli East Upasna Center