Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#10285

ketaki. Kulkarni
Participant

हरिओम

दर्शन..
जेव्हा आपण श्री स्वस्तिक्षेम संवाद करतो त्यावेळी ही ते आपल्या बप्पाचे प्रत्यक्ष दर्शन घेणेच असते. दर्शन म्हणजे काय तर माझ्या डोळ्यासमोर माझा देव मला दिसणे! प्रत्यक्ष किव अप्रत्यक्ष! आणि मी त्याला न्याहाळणे.. हेच तर खरे दर्शन असते..
जेव्हा आपण संवाद करतो तेव्हा संपूर्ण चंडिकाकुल तिथे माझ्यासाठी present असत.. आपण कोणाशी ही अगदी काही ही बोलू शकतो. आणि जेव्हा आपण असे बोलण्यास सुरुवात करतो तेव्हा automatic आपण बोलत आहोत त्या देवाचा चेहरा समोर येतो.. सगळ काही मनातील सांगता संगता, सर्व इच्छा त्याच्याकडे मागता मागता एक वेळ अशी येते की तिथे आपण “देवा मला फक्त तूच हवा आहेस, तुझ्याशिवाय माझ कोणी नाही” ह्या stage पर्यंत येउन पोचतो.. आणि हाच तर दर्शनाचा खरा लाभ आहे!
कसा आहे ना आपला बाप्पा! कस ही करून त्याची बाळ इकडे तिकडे भटकू नये म्हणून किती वेगळे छान छान उपाय आपल्याला देतो ना..
अस आपण आपले डोळे मिटून देवाला आठवायला गेलो तर असंख्य नको ते विचार मनात येतात पण जेव्हा संवाद चालु होतो तेव्हा कधी त्याच्यामधे आपण mix होउन जातो आपलेच आपल्याला समजत नसते.. आता इकडे पण आपण इतर गोष्टी बोलतोच, पण इथे होत अस की हे बोलण direct without any agent त्याच्याशी चालू होत, त्यामुळे असंख्य विचार असताना सुद्धा ते ultimately त्याच्याच चरणांशी जाऊन पोचतात!
हेच दर्शनाचे महात्म्य! सहजपणे बाप्पा आईचे दर्शन घेण्याचा आपल्या बाबानी आपल्याला दिलेला उत्तम मार्ग!
ह्या सुंदर स्वस्तिक्षेम संवादची आम्हाला सर्वाना भेट देण्यासाठी आम्ही खुप खुप अंबज्ञ आहोत बाप्पा!
I love you my Dad forever…
हे त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे

Ambadnya.
Ketakiveera kulkarni