Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8596

Suneeta Karande
Participant

हरि ओम. “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ”
बापूंनीच लिहिलेल्या मातृवात्सल्य-उपनिषदात स्पष्टपणे हेच वारंवार बजावले आहे की ‘सगळंकाही फक्त विश्वासातच आहे’ Yes सगळं विश्वासातच आहे. बापू ह्या विश्वासाचे उदाहरण देताना Nikola Tesla ह्या महान शास्त्रज्ञ ह्याचे खडतर जीवनाविषयी सांगतात २७-०३-२०१४ च्या प्रवचनात की ह्याच Scientist च्या विरोधात सगळे उद्योगपती, राजकारणी, सायन्स area मधली माणसे उभी होती पण ह्याचं काही वाकडं झालं का? एक बिल्डिंग जळली तरीही हा खरोखर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला. देवा मला मार्ग दाखव. त्याने देवाला कधीच कोसलं नाही, त्याने देवाला विचारलं नाही की, ‘शत्रुने बिल्डिंग जाळली तू ती जळू का दिलीस?’ अकरा महिन्यात तीन बिल्डिंग्ज्‌ उभ्या राहिल्यात. त्याने दिवे लावून सगळया राजकारण्यांना, उद्योगपतींना शरण आणलं. लोकं sympathy द्यायची तेव्हा तो म्हणायचा – “God is There!! God is Great !! Mother will take care.”
हा विश्वास एकमेव गोष्ट आहे. हा विश्वासच काम करतो ज्यामुळे मातीची पण उदी होते. आपण श्रीसाईसच्चरितात नाना चांदोरकरांची कथा वाचतो त्यात मातीची उदी होताना वाचतो. पण हे कसे घडते ? ह्याचा अभ्यास करत नाही, मग आम्हा नर्मदेतल्या गोट्यांना बापूच समजावून सांगतात की नानासाहेब चांदोरकरांचा बाबांवरचा विश्वास, त्या मुलीच्या आप्ताचा चांदोरकरांवरचा विश्वास की चांदोरकरांकडे उदी असणारच आणि बाबांची उदी काम करणारच. बाबा द्वारकामाईत आहेत, नानासाहेब ठाण्याला आहेत, आणि मुलगी कोकणात गावी आहे. चांदोरकरांची व त्या व्यक्तीची श्रद्धा – श्रद्धेपेक्षा विश्वास महत्वाचा आहे.
आमची श्रद्धा असते पण आमचा विश्वास नसतो. विश्वास असायलाच हवा. टाईम, स्पेस आणि डायरेक्शन ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजेच विश्वास. आज आपल्याकडे जे-जे चांगलं आहे ते त्याने दिलेलं आहे. तसंच माझ्यासमोर कितीही संकटं असतील, चारी बाजूला अंधार आहे – हा माझ्या देवाचा रंग = विश्वास, हा अंधारसुद्धा विठ्ठलाचाच रंग आहे हा विश्वास पाहिजे. खरा श्रध्दावान हा संकट कधी संपेल ह्याची वाट बघत नाही, त्याला खात्री असते हे संपणारच हा विश्वास हवा.
सपटणेकरांच्या कथेत ह्याच विश्वासाचा अभाव दिसतो, मुळात श्रध्दाच नसते , बाबांच्या चरणीं. शेवडे वकीलांकडून साईनाथांविषयी कळल्यावर त्यांना ते सारे हास्यास्पद वाटते, कारण मुळात त्यांचे मन हे विकल्पपूर्ण असते. ह्याच करिता बाबा म्हणतात की बाबांना कच्चा कोरा मातीचा घडा म्हणजेच आव्याचे श्रमावीण कुंभारा लागे असे हेमाड्पंत ५व्या अध्यायांत प्रतिपादन करतात. बाबा ही स्वमुखे हीच ग्वाही देतात की”सोडूनियां लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा ”
कच्च्या घड्यावर बाबा त्यांना हवे तसे संस्कार करू शकतात, जसे शामाचे कोरे मन होते, माझा बाबा म्हणेल तेच खरे, कधीच इतर गोष्टींना त्यात शिरायला वावच नव्हता.
सपटणेकर एकुलत्या एक मुलाच्या कंठरोगाने निधनाने उद्विग्न होतात आणि कनिष्ठ बंधू पंडितरावांबरोबर जातात बाबांच्या दर्शनाला. हेमाडपंत म्हणतात ही सुध्दा माझ्या बाबांचीच लीला होती सपटणेकरांना आपले चरण वंदावयाला येण्याचे पाचारण करणे म्हणजेच शेवडे ह्यांची स्मृती जागृत करणे.
असे असूनही सपटणेकर बाबांच्या चरणीं श्रीफल अर्पितांना बाबा “चल हट” म्ह्णून धिक्कार करतात, पुढे बाळा शिप्याबरोबर बाबांचा फोटो घेऊन पुनश्च दर्शनाला गेल्यावर ही “हा फोटो आहे याचा यार ” असे ह्सून बाबा उद्गारतात आणि तरी दर्शन घेताना पुन्हा “चल हट ” म्हणूनच उद्गारतात.
अखेर तर ” निघूनी जा येथूनी सत्वर ” अशी आञा करतात बाबा.
मातृवात्सल्य उपनिषदात दुसर्‍या अध्यायात त्रिविक्रमाच्या बोलण्यातून बापूच स्पष्ट सांगतात की मानवाच्या जीवनात जे जे काही घडते , ते ते सर्वच्या सर्व त्या त्या मानवाने स्वत:च स्वत:च्या जीवनात खेचून घेतलेले असते. हे दोन प्रकारे घडते , एकतर पूर्वजन्मातील पाप-पुण्यानुसार व दुसरे म्हणजे ह्या जन्मातील त्याच्या विचारांनुसार , किंबहुना विचारांच्या निवडीनुसार.
आता सपटणेकरांचा पूर्व जन्म वृत्तांत तर आम्हांला माहीत नाही परंतु ह्या जन्मात सद्गुरुंविषयी त्यांचे मन किती तरी विकल्पांनी , अनुचित विचारांनी भरलेले दिसते म्हणजेच बाबांचे “चल हट” हे त्या अनुचिततेला धिक्कारत होते असे वाटते.
आणि आदिमाता चण्डिकेच्या कथनानुसार तिच्या पुत्रावर प्रेम करणा‍र्‍या श्रध्दावानांना नियतीपासून भय नसते. परंतु माणूस स्वत:च्या वाईट विचारांनी, कुकर्माने ह्या वृत्राच्या , नियतीच्या कचाट्यात सापडतो , सपटणेकर मुलाच्या मरणाच्या शोकाने रडतात पण बाबांना शरण जायला तयार नाही स्वत:च्या अंहकारापोटी आणि म्हणूनच तो वृत्र त्यांच्या मनातील दुर्वासनांना अधिक बळ पुरवून त्यांच्याकडून खर्‍या सदगुरुला शरण जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम करवून पाप घडवून देऊ शकतो.
परंतु हे वास्तव साईबाबा जाणतात आणि सपटणेकरांची ही अगतिक स्थिती जाणणारे चण्डिकापुत्र परमात्मा साईनाथांची लढाई सपटणेकरांशी नसून , त्यांच्या कुठल्याच चुकीशी नसून त्या वृत्राशी होती , व बाबा त्या वृत्राला धिककारत होते.
तसे नसते तर वर्ष उलटून गेल्यावर सपटणेकर गाणगापूरला पुनश्र्च गेले असता त्यांचे चित्त स्थिर न करता अधिकच भडकले नसते, आणि माढेगांवी विश्रांतीला गेल्यावर परत काशीला जाण्या आधीच २ दिवस बाबांनी त्यांच्या पत्नीला दृष्टांत देऊन स्वत:कडे बोलावून घेतले नसते.
म्हणजेच बाबा खरे तर सपटणेकर चुकत असूनही त्यांच्यावर कृपा करायला, त्यांना दु:खातून खेचून बाहेर काढायला आतुर आहेत.
कालच बापू श्रीसाईसच्चरितावरील हिंदी प्रवचनांत सांगत होते की self-confidence तेव्हाच वाढू शकतो जेव्हा self-esteem वाढतो पण माणसाकडे ही स्व:तला पारखण्याची म्हणजेच स्वत:ची capacity, competency , potency जाणण्याची क्षमता एकतर खूप कमी किंवा खूप अधिक असते , कारण self-esteem ही बुध्दीची गोष्ट आहे, आणि self-confidence ही मनाची गोष्ट आहे. जेव्हा माणूस स्वत:ची बुध्दी परमात्म्याच्या चरणांवर स्थिर करतो त्याला शरण जाऊन तेव्हा तो स्वत:ला चुकीच्या प्रश्र्नांच्या सहाय्याने चुकीच्या प्रकारे आजमावत नाही, कारण परमात्मा स्वत: त्यात हस्तक्षेप करून चुकीचे आवरण, अञान दूर करतो आणि त्या त्या माणसाला त्याच्या योग्यतेची खरी जाणीव करवून देतो. आणि जेव्हा स्वत: परमात्माच self-esteem वाधवून देतो तेव्हा self-confidence वाढतो म्हणजेच automatically परमात्म्यावरचा आत्मविश्वासही वाढतोच.
हीच गोष्ट रतनजींच्या कथेत वळले की स्पष्ट दिसते की ते दासगणूंनी बाबांविषयी सांगितलेल्या गोष्टींना खरे मानतात , आणि निशंक मनाने , कोणताही तर्क, कुतर्क वा संशय न घेता बाबांकडे जातात. तसे पहायला गेले तर त्या काळानुसार रतनजी हे पारशी धर्माचे ज्यात मानवी सदगुरुंना मानणे ह्याला खूप विरोध होतो. आपल्या बापू परिवारातील एका भक्ताने स्वत:च्या अनुभवात हे नमूद केले होते की बापूंना त्याने स्विकारले तरी घरी किती मोठा प्रखर विरोध होता आणि कसे बापूंची उपासनाही चोरून लपून करावी लागे. मग रतनजींना सुध्दा हा विरोध पत्करावा लागला असू शकतो. तसेच पैशाची मुबलकता, समृध्दी ह्याचा अंहकारही बाबांकडे जाण्यापासून रोखू शकत होता कारण बाबा तर एक लोकांच्या दारोदार फिरून भिक्षा मागून पोट भरणारे , मशिदीत रहाणारे , मुसलमान फकीर होते , त्या काळातील लोकांच्या मान्यतेनुसार… तरीही रतनजीच्या आड काही आले नाही कारण त्यांनी बाबांच्या चरणी दासगणूंच्या सांगण्याला प्रमाण मानून , त्यांना आपले आप्त मानून विश्वास धरला.
हाच तो विश्वास बापू म्हणत असावेत की विश्वास म्हणजे काय तर दिशा, अंतर कापण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची वेळ कधी चुकणार नाही ह्यालाच विश्वास म्हणतात. बाबांनी रतनजींना फक्त “मनाची मुराद पुरवील अल्ला” हा आशीर्वाद दिला होता आणि कोठेही पुत्र होईल हे सुस्पष्ट आश्वासन दिले नाही तरी रतनजी आनंदनिर्भर मनाने परतले आणि योग्य काळ लोटल्यावर रतनजीच्या पत्नीस गर्भ राहिला व सुवेळी ती बाळंत होऊन पुत्ररत्नप्राप्ती झाली. त्यानंतरही १२ मुलांत केवळ ४ जिवंत राहिली तरी रतनजींचा विश्वास अढळच राहिला , हाच तो प्रतिदिनी वाढत जाणारा विश्वास म्हणजेच दृढ विश्वास म्हणजेच दृढ बुध्दी असावी जिचा नवस साईनाथ करायला सांगतात आणि वचनही देतात की अशा दृढ बुध्दी माझ्या ठायी करण्याच्या नवसाला माझी समाधीही पावेल. नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुध्दी माझ्या ठायीं-
अंबज्ञ !!!
सुनीतावीरा करंडे