Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8550

Suneeta Karande
Participant

॥हरि ॐ॥
दादा ह्या फोरमच्या माध्यमातून श्रीसाईसच्चरित वाचताना आपल्या सदगुरुंवरचा विश्वास कसा दृढ करावा, सच्च्या श्रद्धावानाला सद्गुरुंकडे कधीही काहीही मागावे लागत नाही , त्याच्यासाठी उचित ते सदगुरु देतच असतो ही अत्यंत महत्त्वाची तत्वे तुम्ही आम्हांला हेमाडपंताच्या धूळभेटीतून, सपटणेकरांच्या कथेतून आणि रतनजी शापूरजी वाडिया ह्यांच्या कथांतून खूपच सुंदरपणे आणि सोप्या मार्गाने उलगडवून दाखवलीत आणि त्यांचा अभ्यास कसा करायचा हे दाविले आणि एक नवीन दृष्टीकोन दिला, त्याबद्दल मन:पूर्वक अंबज्ञ !!!
अंजनावीरा,केतकीवीरा, श्रध्दावीरा, संदीपसिंह, अनिकेतसिंह, हर्षसिंह, प्रणीलसिंह, सचिनसिंह आणि इतर सर्वांनी खूपच छान रित्या आपापली मतें मांडून सदगुरुंचा गोडवा गायला आहे,
हेमाडपंतविरचिते श्रीसाईसच्चरित हा एक महान अपौरुषेय ग्रंथ आहे आणि त्यांमुळेच त्यात परिशिलन शक्ती म्हणजेच चक्रशक्ती काम करतेच. परिशिलन शक्ती म्हणजे कृतीजन्य संशय व तर्क ह्यांचे तुकडे करून परत सुविहित रचनेची निर्मिती करणे. आपण नेहमी बघतो की भागवत संप्रदायात म्हणजेच वारकरी लोक कधीही त्यांच्या विठू माऊलीवर , त्यांच्या सदगुरुरायावर शंका -कुशंका जराही घेत नाही. बापूही म्हणूनच आपल्याला वारकरी शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात की जो संकटाला न घाबरता, भिता, न डगमगतां धैर्याने तोंड देतो “त्या”च्या चरणांवर अढळ विश्वास ठेवून म्हणजेच जो प्रारब्धावर वार करतो, कळीकाळाला मात देतो तो खरा वारकरी !!! सपटणेकरांच्या कथेत त्यांचे मन नाना-विध शंका-कुशंकानी ग्रासलेले आहे आणि ते स्वत: प्रांजळपणे हे कबूलही करतात की
आरंभी मी बाबांविषयीं । होतों कुतर्कीं तैसाच संशयी । तेणेंच वाटलें ऐसिया उपायीं । बाबाच मजला ठाय़ीं पाडीत ।। १२४ ।।
आता सदगुरु साईनाथांना सपटणेकरांच्या ह्याच चुकीच्या वृतींचे खंडण करायचे आहे म्हणून ते सतत “चल हट ” ह्या शब्दांनी त्यांची निर्भत्सना करतात, त्यांना धिक्कारतात , जोवर त्यांना स्वत:हून ह्याची जाणीव होत नाही. जेथे अंहकार असतो तेथे भक्तीभाव प्रकटू शकत नाही. “ठम” बीज हे परिशिलन आहे कारण ती विठ्ठलाची शक्ती आहे…साईनाथ म्हणजेच पंढरीचा विठ्ठलपाटील हे सतत, निरंतर जिव्हेने “रामकृष्णहरी” गजर म्हणणारे आणि वर्षातून एकदा पंढरीची वारी करणारे ९५ वर्षांचे गौळीबुवा पटवून देताना आपण ४थ्या अध्यायांत वाचतो. तोच हा पंढरीचा पळपुट्या विठ्ठल पाटील साई बनून सपटणेकरांच्या मनातील कुडा भाव काढून टाकून “त्या”च्या “त्या” एकाच्याच चरणीं दृढ व्हायला शिकवित आहे. अहं बीजाचे निमूलन फक्त साईनाथच करू शकतात. सदगुरु हा सर्वसाक्षी, सर्वव्यापी, त्रिकालदर्शी असल्याने सर्व काही जाणतोच जसे मीनावैनी म्हणतात –
सर्वसाक्षी आहे बापू तो काय जाणेना ।
परी वर्ते मानव बनूनी म्हणे मी अजाणता ।
हा साई=अनिरुद्ध मानव भूमिका धारण करतो म्हणून मानवत्वाच्या सर्व मर्यादाही पाळतोच. तसेच साईनाथ सपटणेकरांचा भूतकाळही जाणत असतात आणि वर्तमानही…म्हणूनच ते त्यांना खूण पटवितात की मशिदीत येऊन रडून तू माझ्यावर आरोप करतो आहेस की मी लोकांची पोरे मारतो (येथे सपटणेकरांच्या एकुलत्या एक मुलाचे कंठरोगाने निधन झाले आहे हे बाबा जाणतात.)
परंतु जरी सपटणेकरांचा मुलगा हा कर्माच्या अटळ सिंध्दांताने गेलेला असला तरी साईनाथ स्वत:च्या अकारण कारुण्याने त्यांचा मुलगा परत जन्मास घालतात आणि मुरलीधर ह्या ८ महिन्यांच्या मुलास घेऊन सपटणेकर निजपत्नीसह परत येऊन साईंच्या चरणीं घालतात. येथे बापूंनी सांगितलेला त्रिविक्रमाचे प्रवचन आठवते की अरे, बाळांनो चूक झाली असेल , पण विसरायला काय हरकत आहे? विसरायची क्षमता आमच्यात नसते. आम्ही देवाला लवकर विसरतो, पण माणसाने केलेल्या चुका मात्र आम्ही कधीच विसरत नाही, त्या आठवतातच. कुठलीही व्यक्ती भेटल्यावर त्यने चांगल काम काय केलंय ? हे आठवण्याऐवजी त्याने वाईट काय केलंय? हे पहिल्यांदा आठवतं. पुढे बापू म्हणाले होते हा “त्याचा” मार्ग नाही, हे आम्हांला कळलं पाहिजे. त्रिविक्रमाचा हा मार्ग नाही. तो जेव्हा तुम्हाला बघतो , तेव्हा तुम्ही काय चुका केल्यात त्याची बेरीज करीत बसत नाही. तो गुणाकार करीत राहतो.
आपण सपटणेकरांच्या कथेत हेच पाहतो की बाबांकडे जाऊनही त्यांच्या मनातले कुतर्क शांत होत नाहीत , ना शंका-कुशंका थांबत म्हणूनच बाबा त्यांना “चल ह्ट” म्हणून धिक्कारतात. पण सपटणेकर जसे बाबांवर वृथा आरोप करतात, चुका शोधतात्त तसे मात्र बाबा करीत नाही, सपटणेकरांनी शेवडेंनी सांगितल्यावर दाखविलेला अविश्वास, १० वर्षांच्या मोठ्या काळानंतर ही बाबाच स्मृती देऊन जागवितात व परत येण्याची संधी देतात ( निमित्त शेवडे ह्यांचे स्मरण । वंदावया आपुले चरण । साई़च तया करिती पाचारण । तैं सावचित्त श्रवण करा ।। ७५ ।। ), तीही ते स्वत:च्या कर्मांनी वाया दवडतात व परत साईंनाच बोल लावतात.. तरीही बाबा म्हणजेच ही कनवाळू सदगुरुमाय आपल्या बालकाचे सर्व निंद्य अपराधही पोटातच घालते, आणि त्या चुकांचे स्मरण ठेवत नाही.
सपटणेकरांची कथा वाचताना आदयपिपांचा अभंग आठवला की
इंद्रधनुच्या नादात विसरतो आकाश ।
प्रतिमेच्या मागे सारे, आरशास पुसे कोण ।।
भ्रमामागे लागूनिया चुकताती सर्व यत्न ।
सुखामागे येता दु:ख , करपतो इंद्ररंग ।।
स्वत:च्या वकिलीच्या अंहकारापोटी अक्कलकोटला राहूनही सपटणेकर “त्या”ला म्हणजेच आयुष्यात इंद्रधनुच्या रंगाची उधळण करणार्‍या “त्या” आकाशाला विसरले व स्वत:च्याच मी पणाच्या प्रतिमेत अडकले आणि सुखाचा काळ ओसरून पुत्राच्या मृत्युच्या दु:खाने ग्रासताच त्यांच्या आयुष्यातील अंहकाराचा इंद्ररंग करपला गेला.

दादांनी स्मजाविलेला
हेमाडपंतानी वर्णिलेला दर्शन महिमा सपटणेकरांच्या कथेतही आढळतोच
हरले सर्व भास भ्रम , साई दिसला प्रत्यक्ष ।
म्हणजेच फक्त साईनाथांच्या, सद्-गुरुंच्या दर्शनाने काय झालं :
१) माझिया मनाचा विकल्प झडला – सपटणेकरांच्याही मनातील विकल्प नष्ट झाले अर्थातच काही कालावधीने कारण सुरुवातीला शारण्यभाव मुळीच नव्हता.
२) परम प्रकटला आनंद – पुत्राच्या पुनर्प्राप्तीचा सपटणेकरांच्या जीवनातील सर्वोच्च (परम) आनंद त्यांना अनुभवता आला.
३) पूर्वकर्माची मावळे सई – साईंना दोष देण्याचा गकर्माचा “अनिष्ट प्रभाव” लय पावू लागला हळूहळू
४) वीट विषयीं हळूहळू – षड्-रिपूंपासून भक्त / श्रद्धावान लांब जातात म्हणजेच त्यात ते सहजतेने अडकत नाहीत. साईंच्या चरणीं विश्वास आल्याने मनाची चंचलता, उद्विग्नता निवळली,
अत्यंत महत्वाचे म्हणजे साईंच्या कृपेने मनाची संशयी वृत्ती लोप पावली आणि मनाचे नम: झाले साईंच्या चरणीं!!!
असो तो मुलगा मुरलीधर । आणिक दोन भास्कर दिनकर । यांचियासमवेत सपटणेकर । प्रसन्नांतर जाहलें ।। १७२।।
अर्थातच साईंच्या अगाध प्रेमापोटीच सपटणेकरांना काही न मागतांच आणिक दोन पुत्रांची प्राप्ती झाली.
याउलट रतनजीच्या कथेतून दासगणूंच्या गुणसंकीर्तनाने साईंच्या चरणीं श्रध्दा धरून आलेले रतनजी शंशयाने भरलेली, ,पूर्वग्रह दुषित अशी मनाची पाटी न ठेवतां कोरी पाटी घेऊन आले आणि ज्यावर साईनाम घट्ट्पणे कोरून गेले आणि सौख्य पावतें जाहले. हेमाडपंत खूप रसाळ भाषेतून ह्याचे वर्णन करतांत
घडतां बहुसाल अवर्षण । व्हावें अवचट पर्जन्यवर्षण । तैसें हे शेटजी निवालें पूर्ण। पुत्रसंतानप्राप्तीनें । ।
पुढें तो वंशवेल जो फुलला । यथाक्रम विस्तारत गेला । कन्या-पुत्रीं सुखें डंवरला । सौख्य लाधला रतनजी । ।
पुढेंही जात साईदर्शना । पावूनि तयांच्या आशीर्वचना । पूर्ण जाहल्या मनकामना । तुष्टलें मना रतनजी । ।

सद्गुरुचींच इच्छा जीवनात प्रत्येक क्षणीं कार्यरत होवो म्हणून बापूंनीच शिकवलेली प्रार्थना “त्या”च्या चरणीं करू या
हे मायबापगुरु माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेनेच होवो !!!

अंबज्ञ !!!
सुनीतावीरा करंडे