Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8549

Pranilsinh
Member

॥हरि ॐ॥

रतनजींच्या कथेवरून आपल्याला परमात्म्याच्या plan बद्दल नीट समजण्यास मदत होते. सद्गगुरूचा श्रद्धावानाच्या आयुष्यात असणारा हस्तक्षेप हा नेहमीच पूर्वनियोजित असतो. कारण आपल्याला परमात्म्याची ताकद नीट माहीत नसते. पण “तो” सर्वसमर्थं आणि त्याची माय चण्डिका सर्वार्थसमर्थं आहे. ते आपल्या बाऴाचे उचित तेच करणार. हा विश्वास असला पाहीजे.

बापूंनी एकदा प्रवचनात सांगितलेलं की जो कोणी श्रीअनिरूद्ध गुरूक्षेत्रम् व गुरूक्षेत्रम मंत्रावर मनापासून प्रेम करेल त्यांच्या जीवनाचा त्रिविक्रम हा “हुकूमशाह” असेल. तो त्याची श्रद्धावानांच्या आयुष्यातली जागा कधीच सोडणार नाही.

You are not judged by your performance, You judged by your “FAITH”.

आपला सदगुरूवर कसा, किती विश्वास आहे, ह्यावर आपल्याला येणारे अनुभव वेगवेगळेच असतात. मात्र “त्याचं “आपल्या प्रत्येक बाळासाठी planning हे वेगळचं असतं. हर्षसिंहने सदगुरूवरील विश्वास उपनिषदच्या द्वारे उत्तम मांडला. त्या घटनेमागे असलेला मोठ्या आईचा well maintained plan दिसून येतो. परमात्म्याचा plan अवर्णनीयच असतो. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या निवडींचा अगत्याने स्वीकार केला पाहिजे. आपल्या जीवनाच्या शेतात परमात्म्याला जे हवयं ते पेरण्याचे contract मनापासून दिले पाहिजे. कारण “तो” माझ्या जीवनाचा एकमेव “मालक” आहे. (प्रवचन दि. ७/६/१२).

सदगुरूच्या भरोस्यावर(रामभरोसे) जगणे म्हणजे संपूर्ण विश्वास. देवा तुला माझ्या जीवनात जे करायचयं ते नक्की कर. त्यात माझचं भलं आहे, १०८%.

एकदा का मनापासून त्याला आपल्या जीवनाचा contract कायमचा दिला की मग तो स्वतः आपल्या जीवनाचा Remote control घेऊन चांगल्या त्याच गोष्टी घडवतो आणि कधी संकट आणून अर्धी स्वतः सामोरे जाऊन अगदी नगण्य आपल्यासमोर ठेवतो कारण आपण न घाबरता त्या संकटांचा सामना करावा म्हणून. हा ही त्याच plan असतो.

ज्याअर्थी आज आपण बापूंबरोबर आहोत, ही त्या मोठ्या आईची निवड, plan आहे. आणि चण्डिकेच्या plan पुढे जगातले कोणीही काहीच करू शकणार नाही.
कारण……
माझा बापू भारी नव्हे लय भारी आहे.

अंबज्ञ..

प्रणिलसिंह टाकळे.
तेलगु केंद्र,दादर…