Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8548

Harsh Pawar
Participant

हरी ॐ दादा, मला खरच खूप कौतुक करावस वाटत आहे, ज्या पद्धतीने तुम्ही इथे ह्या सर्व कथांना एकमेकांशी जोड़त आहात.. आपला प्रवास हेमाडपंतांपासून सुरु झाला होता मग वाटेत आपली भेट सपटणेकरांशी झाली आणि आपण आता रतंजिंना भेटत आहोत… इथे आपण सद्गुरुंवर आपला असायला हवा असणार्या विश्वासाबद्दल बोलत आहोत.. वर प्रणिलसिंहने सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट मनाविरुद्ध जरी घडली तरी सच्चा श्रद्धावान आपल्या सद्गुरुला दोष न देता आपल्या मार्गावरुन पुढे चालतच राहतो आणि हेच आपण रतनजींच्या बाबतीत ही पाहतो.. माझ्या मते संकटासमयी माझी वर्तणुक कशी आहे हेच पुढे सर्व काही ठरवत असत.. मी सद्गुरुला दोष देत बसणार की scientist Nikole Tesla प्रमाणे सर्व गमावाल्या नंतर देखिल परमात्म्याला फक्त “मला मार्ग दाखव” म्हणून प्रार्थना करणार आहे..?

मला इथे संकटासमायी किंवा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तेव्हा आपली वर्तणुक कशी हवी ह्या करिता उपनिषदामधली, अध्याय क्रमांक 6 मधली एक अतिशय सुंदर कथा आठवत आहे.. कश्यप ऋशींची पत्नी अदितिमती हिच्या मनात आदिमातेचे आभार मानण्यासाठी तिच्या पवित्र तीर्थक्षेत्री जाउन काही साधना करावी अशी इच्छा उत्पन्न होते.. तेव्हा कश्यप ऋशी तिला कैलास पर्वतावरील ‘वायुगति’ नामक स्थानाची तीर्थ यात्रा करण्यास सांगतात.. तीर्थ यात्रा करत असताना वृद्ध अदितिमती नकळत एका खड्ड्यात पडते व तो खड्डा खुपच खोल असतो.. पुढे अदितिमती त्या खड्ड्यातुन कशी बाहर पडते हे आपण वाचलच असाव.. इथे अदितिमतीने खड्ड्यात पडल्यानंतर आदिमातेची केलेली प्रार्थना खुप खुप महत्वाची आहे :
” हे माय चण्डिके! तुझी लीला अगाध आहे.. बहुतेक माझे कष्ट वाचवण्यासाठी, ह्या खड्ड्यातुन तू मला थेट तुझ्या मंदिरात घेउन जाणार आहेस किंवा तुझ्या मणिद्वीपामधे तरी.. तू आतापर्यंत माझ्या साठी जे काही केलस व करत आहेस, त्याबद्दल मी सम्पूर्ण कृतज्ञ आहे… तू माझी लाडकी आई आहेस आणि मी तुझी लाडकी लेक आहे”

मला सांगा ह्याहून सुंदर प्रार्थना, सुंदर भाव असू शकतो का?? माझ्या “downfall ” मागे ही तुझ काही सुंदरच planning आहे हा भाव असायला हवा.. हा भाव हा सद्गुरुंवरचा विश्वास कमवण तेव्हाच सोप्प आहे जेव्हा मी माझ्या जीवनाची नाळ सद्गुरुंशी घट्ट जोडून ठेवतो.. मोठ्या आईचे चरण घट्ट धरून ठेवतो, उपनिषदाला छातीशी कवटाळून ठेवतो.. खड्ड्यात पडल्यावर अदितिमतिने त्याला अपशकुन समजुन आपला प्रवास थांबवला नाही… आदिमातेचे स्मरण करत करत त्या पुढे चालत राहिल्या.. this is exactly how our faith should be when the chips are down… अंबज्ञ बापुराया …अंबज्ञ दादा.. तुम्ही असच ह्या साईंसच्चरित्रावर सुरु असलेल्या अखंड discussion रूपी यज्ञात सुगंधीत समिधा अर्पण करत रहा आणि बापुराया तुम्ही आम्हाला बळ देत रहा ह्या यज्ञात आमचा हातभार लागत राहो ह्या करीता…
श्री राम
मी अंबज्ञ आहे
~ हर्षसिंह पवार
दिंडोशी उपासना केंद्र