Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8480

ketaki. Kulkarni
Participant

हरी ॐ,

जीवनाच्या महासागरात आहे अजुन एक महासागर. हा महासागर म्हणजे हे श्रीसाइसच्चरित!
ह्या महासागरामधे कितीही खोलवर गेलात तरी बुडण्याची भीती नाही. उलट जितक खोल खोल आपण शिरत जाऊ तितकाच जास्तीत जास्त आनंद आपल्याला मिळत जातो. तितकच मोट्ठ सुख आपण मिळवत जातो.
पण हे सुख मिळवण्यासाठी मात्र मला सुरुवातीला निश्चयाच्या होडी मधे बसायला हव, की मला माझा साइराम पाहिजे आहे, माझा महाविष्णु पाहिजे आहे जो ह्या समुद्राखाली लक्ष्मी आई व शेषदादांसोबत पहुडलेला आहे. आणि ह्या होडी चे नावाडी म्हणजेच आपले आद्य पीपा काका, मीना वैनी, साधना ताईंसारखे भक्त, जे मला योग्य दिशेने प्रवास करायला प्रेरित करतात. आणि एकदा का हळू हळू त्या होडीतुन फिरत फिरत हा निश्चय दृढ़ झाला की मग त्याच निश्चयाचे रूपांतर आता दृढ़ विश्वास व श्रद्धेत करून त्या महासागरात उडी घ्यायची. आणि मग परत ह्या guides चाच हात पकडून त्यात खोल खोल जात रहायचे.
आणि जेव्हा आपण ह्या महासागरामधेे बुडून जाऊ तेव्हा मग ह्या जीवनाच्या महासागरात येणार्या त्सुनामी लाटा असो किवा अडथळे आणणारे, ठेच लावणारे नियातिने निर्माण केलेले वृत्रासुराचे गोटे असो, ह्यांचा नाश करून मला पैलतीरी पोचवण्यासाठी हा अनिरुद्धाराम, देवीसिंह आपल्या मोठ्या आईबरोबर येतोच येतो!

Ambadnya
Ketakiveera kulkarni
Dombivli east upasna center