Reply To: The incidents and stories in the Saisatcharit relating to Lord Shiva

#851

Suneeta Karande
Participant

The incidents and stories in the Saisatcharit relating to Lord Shiva

हरि ओम. दादा ,आपण आम्हांला खूपच मौलिक मार्गदर्शन केले आहेत. आता पर्यंत अध्याय ४७ मधली कथा ही फक्त सर्प-बेडूक यांची पुनर्जन्माची कथा आहे असेच वाटत होते.आपण कथेत शिव आहे. सदर कथेमध्ये शिवाचा उल्लेख दोन तीन ओव्यांमध्ये नाही तर संपूर्ण कथा ही शिव आणि शिवाचे कार्य – लय करण्याचे कार्य यावर फिरते, हे सांगुन नवीन दिशा दाखविलीत. एका वेगळ्या दृष्टीकोनातुन आता ह्या कथेचाही अभ्यास करता येईल.
सध्या आम्हांला discussion साठी दिलेल्या Topic वर लक्ष केद्रींत करु या.
हेमाडपंत २८व्या अध्यायाच्या सुरुवातीला बाबा कसे भक्तांच्या स्वप्नी जाउन त्यांना दर्शन देत हे सांगताना मार्मिकपणे हे ही रहस्य उलगडुन दावतात की बाबा हे सर्व करताना त्या , त्या भक्तांची अनेक सांकडी, संकटे टाळीत आणि त्यांना विवीध प्रकारे प्रबोधन करवुन निजपदी रमवित, “त्याच्या” चरणांची गोडी लावत. ह्या कथांची अपूर्वाई काही न्यारीच आहे, ह्या कथा ऐकणारा ही आणि गाणारा दोघेही धन्यच होतात. लालाजी उर्फ लखमीचंद, मेघा आणि बर्हाणपूरस्थ बाई ह्या ३ चिडयांच्या गोष्टी येतात , त्यात हेमाडपंत मोठ्या खुबीने सांगतात की दोघे समरसती ठायींचे ठायीं , आणि सौख्य तेही कसे तर अक्ष्य्य लाधले. मला वाटते की लखमीचंद आणि मेघा हे ते दोघे असावेत, जे जीवनाच्या अंतीम समयापर्य़ंत साईचरणी रमले होते आणि अक्षय्य सौख्य ही पावले होते.
बाबांच्या स्वमुखीचे अमोघ बोलच दावतात त्यांची अजब लीला – ” माझा माणूस देशावर | असो कां हजारों कोस दूर | आणीन जैसे चिडीचें पोर | बांधून दोर पायांस |
वास्तविक पहातां, मेघा हा गुजराती ब्राम्हण शिरडीला अवचितां म्हणजे अचानकपणे सेवेसाठी आला, जो सुरुवातीला रावबहादूर साठे ह्यांच्या पदरी चाकरी करीत होता , त्याच्या शुद्ध सेवेने ओतप्रोत भरलेल्या अंत:रंगामुळे त्याला शिरडीला बाबांच्या चरणांशी पायरी लाधली. (मेघाचे क्रियमाण)
शिरडीस ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे – हे बाबांचे पहिले वचनच आहे, पण बापूंनी सांगितले तसे पहाता- शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी हे तर साईंचे आश्वासनदर्शक गुरुवाक्य !!! मग मेघा हा साईनाथांना आधीच शरण आला होता का? असा प्रश्न पडतो. पण वस्तुस्थिती पहाता तसे घडलेले आढळत नाही. हेमाडपंतच लगेच त्याचेही उत्तर देतात लगेच पुढ्च्याच ओवीत की ज्याला भक्तिप्रेमाची आवड आहे, त्याचे कोड, मनीची इच्छा स्वयं श्रीहरी , साक्षात परमात्मा पुरवितो. आता साई म्हणजे साक्षात ईश्वर , परमात्मा, श्रीहरी , त्याच्यांसवे ऋणानुबंध असल्यामुळे (मागील जन्मांचे – जे मेघाला माहित ही नव्हते , पण साईनाथ जाणत होते ) मेघा चिडीच्या पोराप्रमाणे खेचला जातो, थेट शिरडीत, साईंच्या चरणीं !!!
रावबहादूर साठे हे खेडा जिल्ह्याचे प्रांत अधिकारी होते. त्यांनाही मेघा अवचित भेटल्यावर, त्यांनी त्याला स्वत:च्या घरी शिवालयाच्या नित्य पूजेसाठी तैनात केला. पुढे आपण आधीच १८व्या अध्यायांत वाचतो की परिस्थितीने गांजुन साठे शिरडीला उद्विग्न मन शांत करण्यासाठी साईनाथांची महती ऐकुन येतात. साठेंचे भाग्य उदयाला येते आणि त्यांना साई महाराज भेटतात व त्यांच्या चरणीं त्यंचे चित्त रममाण होते. येथे साठेंच्या घरी शिवालयात नित्य पूजा करणारा मेघा – त्याचे संचित मोठे असल्याने परमार्थाच्या मार्गी लागतो, साठ्यांच्या प्रयत्नांनी ! साठेंनी मेघाची परवशता पाहुन ,त्याची कर्मभ्रष्टता पाहुन त्याला गायत्री उपदेश केला आणि त्याचा सन्मार्गावर प्रवेश करवुन दिला. साठ्यांच्या घरी सेवा करताना मेघाचा त्यांच्या ठायी आदर भाव वाढला आणि तो साठ्यांनाच गुरु मानुन त्यांच्या वर त्याचा लोभ जडला.असेच एकदा सहज बोलतांना साठे मेघाला निजगुरुंचा- साईंचा महिमा सांगताना , साई गुरुमाउलीवरील प्रेमात ओथंबुन जाउन स्व मनीची इच्छा सांगतात ती मह्ण्जे साईंना गंगोदकाने स्नान घालण्याची आणि त्याच कारणासाठी ते मुख्यत्वे मेघाला शिरडीस पाठवतात. आणि साठे मेघाला हे ही स्पष्टपणे सांगतात की तुझी अनन्य सेवा पाहुन माझ्या जीवाला वाटते की तुला ही सदगुरुंची भेट मिळावी आणि त्यांचे ठायी तुझा भाव जडावा, जेणे करुन तुझ्या ह्या देहाचे सार्थक होईल, या जन्माचे परम कल्याण होईल. साठेंना मेघा गुरुच मानीत होता म्हणुन साठे त्याला कळ्कळीने सांगतात की जा, जा काया, वाचा, मनाने सदगुरुंचे पाय धर. आता सुरु होतो तो मेघाच्या मनातला शंका- कुशंकाचा खेळ – मेघा साठेंना बाबांची जात विचारतो, वस्तुत: साठे ह्या विकल्पात स्वत: न पडले असल्यामुळे त्यांना त्याची जरुरी, गरज भासत नाही, आणि त्यामुळेच ते त्या फंदातही पडत नाही. एका गुरुचरित्राच्या पाठानंतर तत्काल साईंची कृपा संपादन करण्या एवढी साठेंची मनोभूमिका तयार असते म्हणुनच..
हेमाडपंत २३व्या अध्यायांत स्पष्ट च सांगतात की
असतां शिष्याची भूमिका तयार | सदगुरुसिध्दीसी नाहीं उशीर | ते तों सदैव अनुग्रह्तत्पर | एकाचि पायावर उभे ||१९४ | |
येथे बापूरायानेच श्रीविद्यामकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्येजींची गोष्ट आठवुन दिली की लोक वा मित्र काही म्हणोत बाबा मुसलमान आहेत, बाबा फकीर आहेत, बाबा भिक्षा मागतात, बाबा दक्षिणा (पैसे) मागतात. पण गोपीनाथ शास्त्री पाध्येंच्या मनात कोठेही विकल्पाला वाव च नव्हता मुळी , काहीही होवो ते माझे सदगुरु आहेत. काय अनन्य निष्ठा आणि दृढ , अढ्ळ विश्वास !!!!!
तर पुढे पाहू या –
परंतु बाबा मशिदींत बसत असल्यामुळे त्यांना काही लोक अविंध (मुसलमान) म्हणत. (विंध म्हणजे कान ज्याचे टोचले आहेत तो हिंदु आणि नाही टोचले म्हणजे तो मुसलमान असे त्या काळी वर्गीकरण होत असे, असे वाचले आहे). आणी येथेच मेघाचे मन आणखी कुशंकेने गढुळ होते , त्याच्या मनीं दुश्चित्तता येते की यवना सारखा दुसरा नीच नाहे, आणि मग त्या अशा माणसाची गुरुता कशी काय स्विकारायची बरे? म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती –
हनुमान स्तोत्रात ही आपण म्हणतो की आला गेला मनोगती | मनासी ताकिले मागे गतीसी तुळणा नसे |
परत मेघा पडला साठेंच्या गुरु शब्दात अडकुन – जाणार नाही म्हणुन ही सांगु शकत नव्हता कारण एका मनात साठे – म्हणजे त्याचे स्वत:चे गुरु रागावतील ही भीती होती, तर दुसरे मन सांगत होते हो म्हणुन जावे तर त्याने आपलीच दुर्गती होईल. अशा द्विधा मनाच्या अवस्थेत , कात्रीत सापडलेल्या मेघाला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. त्याचे स्वत:चे मन झोपाळ्याप्रमाणे दोलायमान म्हणजेच अस्थिर झाले होते. मती चालत नव्हती आणि तो चिंतेने ग्रासुन गेला होता. परंतु साठ्यांचा फार आग्रह झाल्यामुळे साईंच्या दर्शनाचा निर्धार* करुन मेघा शिरडीस येतो. पण तो मशिदीच्या अंगणात येतांच , पायरी चढूं लागतांच बाबांनी लीला सुरु केली, उग्र स्वरुप धारण केलें , हातात पाषाण (दगड) घेउन म्हनाले खबरदार पायरींवर पाउल ठेविलें , हे स्थान तर यवनाने वसविले आहे, मेघा पहिल्यांदाच शिरडीत पाउल ताकत असला आणि त्याच्या दृष्टीने बाबांची आणि त्याची ओळख नसली तरी बाबा बोलतात तूं तर उंच वर्ण असलेला ब्राह्मण आहे आणि मी तर नीचांचा नीच यवन आहे, तुला माझा विटाळ होईल, माघारा जा परतोन. पण प्रत्यक्षात मात्र साईंनी जरी कातावलेपणाचें रुप धारण करुन प्रत्यक्ष प्रळयरुद्राचे स्वरुप दाखविले असले तरी त्यांच्या अंतरी दयेचा पूरच वहात होता मेघासाठी. तो राग वरवरचा होता. पहाणार्याचा थरकांप उडावा असे बाबा चिडले होते , त्यामुळे मेघा चळ्चळ कापूं लागला. मनांतुन तो आश्चर्यचकित झाला कि मी कोठे दूर खेडा जिल्ह्यात आणि बाबा कोठे अहमदनगरमध्ये, तरी ह्यांना माझ्या विकल्य- कल्पांनी भरलेले अंतर कसे काय कळले? त्याचे हे दृश्य मला बाबांनी दाखविले. बाबा जो, जो मारण्यासाठी धावत तसा तसा मेघाचें धैर्य खचत होते, आणि तो घबरुन त्याचे एकेक पाउल मागे मागे पडत होतेआणि तो पुढे बाबां जवळ जायला धजत नव्हता, घाबरत होता. तसाच काही दिवस तो राहिला, जमेल ती सेवा करीत गेला पण त्याचा दृढ विश्वास न पतल्यामुळे तो परत घरी गेला आणि ज्वरानें अंथरुणावर खिळला. पण बाबांच्या अकारण कारुण्याने, ज्वरामध्ये ही त्याची मनाची आर्तता बाबांसाठी वाढली, बाबांचा ध्यास लागला मनाला आणि तो परतोनि शिर्डीस आला.
ज्वर दर्शवितो प्रज्ञापराधात रोग:.
बापू गुरुवाक्याबद्द्ल सांगताना म्हणाले होते कि तो साई एवढा प्रेमळ आहे कि तुम्ही शिरडीत आलांत ना तेव्हांच तुमचे शारण्य असो वा नसो, तो ते पहिले पाउलही शारण्यच मानुन घेतो. मेघाच्या बाबतींत हीच सत्यता निदर्शनास येते.
विशाखावीरांनी शिवाचा जो ज्ञानाचा उपदेश करणारा, अज्ञानाचा निरास म्हणजेच नाश करणारा, उचित दिशा दाखवणारा अन्योन्य संबंध प्रतिपादन केला ,तेच येथे दिसते की साईनाथ मेधाच्या अज्ञानाचा नाश करतात आनि त्याला उचित दिशाच दाखवतात. त्यावरुन अजुन एका पहिल्या अध्यायातील ओवीची आठवण होते ती म्हणजे –
शिवशक्ती पुरुषप्रकृती | प्राणगती दीप्दीप्ती | ही शुद्धब्रह्मचैतन्यविकृती | एकीं कल्पिती द्वैतता ||६७ ||
प.पू.बापूंनी ०९.०६.२०११ रोजी केलेल्या हिंदी प्रवचनात ह्याचे स्पष्टीकरण देताना संगितले होते की भगवान शिव गतिस्वरुप आहे तर अन्न्पूर्णा शिवा ही विचारस्वरुप आहे. शिव हा धैर्य आहे तर उमा ही श्रद्धा आहे. शिव हा निर्णय आहे तर पार्वती ही क्रियारुप आहे. शिव हा निश्चय आहे तर पार्वती ही कृतीस्वरुप आहे. शिव हा प्राण आहे तर उमा ही गती आहे. शिव हा स्थैर्य आहे तर शिवा ही गती आहे. परंतु ह्या दोघांना एकत्र ठेवण्याचे काम सदगुरु स्वरुपच करते. ही त्या सदगुरुंची लीला असते. सदगुरुला आपला सर्वात जवळचा bestest friend माना. शिवशक्ती पाहिजे म्हणजेच श्रद्धा-सबुरी पाहिजे तर त्यासाठी सदगुरुंसारखा अन्य सखा , मित्र दुजा कोणी नाही. श्रद्धा-सबुरीच्या बळासंगेच प्रारब्धाशी लढण्यासाठी अस्त्र, शस्त्र,कवच , ताकद देणारा असा हा एकमेवा अद्वितीय म्हणजे फक्त आणि फक्त एकमेव सदगुरुच होय.
* मेघाच्या गोष्टीत आपण पहातो की मेघाकडे साईंकडे जाण्याचा निर्धार आहे , निश्चय पण आहे तरी
उमा म्हणजे भक्तीचे क्रियारुप वा कृतीरुप येत नाही. कारण ह्या दोघांना एकत्र ठेवण्याचे काम सदगुरु स्वरुपच करते. ही त्या सदगुरुंची लीला असते.आणि त्याच सदगुरुंना म्हणजेच साईंना स्विकारण्यास मेधाचे मन तयार नसते.
हेमाडपंतानी श्रीसाईसच्चरित ह्या अपौरुषेय ग्रंथात हा सदगुरु साईबाबांचा अगाध महिमा वर्णिला आणि त्याच साई-अनिरुद्धाने तो आम्हांला शिकविला. अहोभाग्य आमचे !!!!!!!
समीरदादा , तुम्ही दिलेल्या ह्या discussion forum मुळे पुन्हा पुन्हा नव्याने श्रीसाईसच्चरिताची अवीट गोडी चाखता येते, विस्मरणाच्या संदुकीत जाउ शकणार्या बापूंच्या बोलाची परत ,परत आठवण जागृत होते, आम्ही तुमचे अगदी अनंत वॆळा ॠणी आहोत म्हणणे ही चुकीचेच आहे त्यापेक्षा एवढेच म्हणते –
ज्यांचेनि पावलों परमार्थातें | तेचि कीं खरे आप्त भ्राते | सोयरे नाहींत तयापरतें | ऐसें निजचित्तें मानीं मी || १४२||
केवढा तयांचा उपकार | करुं नेणें मी प्रत्युपकार | म्हणोनि केवळ जोडुनि कर | चरणीं हे शिर ठेवितों || १४३ ||
श्रीराम .
सुनीतावीरा करंडे.