Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#858

Yogesh Joshi
Member

साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व.The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva

हरी ओम
श्री मेघा यांच्या साई भक्ती बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे तरीपण हा थोडासा प्रयास करतो. मेघाच्या कथेत ते श्री साई नाथाना स्नान घालण्यास खूप पायपीट करून गोदावरीचे जल आणतात तसेच जंगलात हिंडून बिल्व पत्रे गोळा करतात. ह्या गोष्टींचा संदर्भ ११ वा अध्यायमधील हाजी फाळके यांची कथा आणि २१ वा अध्याय मधील नाणे घाट चढण्याच्या कथेत आढळतो. हाजींची भक्ती उधृत होते ३ प्रश्नांनंतर, त्यापैकी एक होता बिकट वाट चालून येणार काय ? तर नाणे घाट चढल्याशिवाय शिर्डीचे दर्शन नाही म्हणजे येथे ही आधी खडतर प्रवास करून मग भक्तीमार्ग दृढ करता येतो याचीच शिकवण दिली जाते. मेघा ही बिकट वाट आपल्या लाडक्या दैवतासाठी नित्य नेमाने आणि अगदी आनंदाने पार पाडत असे. म्हणजे तो पहिली ते दहावीपर्यंत परीक्षा एका झटक्यात आधीच पास झालेला होता आता प्रश्न होता तो त्याच्या पुढील परीक्षेचा आणि त्या अनुषंगाने त्याने साठ्यांचा निश्चय जो होता बाबाना गांगोदाकाने स्नान घालण्याचा तो पूर्ण करण्याचा निर्धार केला. ह्यावेळी त्यास एका यवनावर हे गंगोदक अर्पण करायचे आहे हे माहित झाले होते तरी साठेंना तो गुरुस्थानी मानत असल्याने तो ह्या गोष्टीस तयार झाला म्हणजेच गुरूचा शब्द हेच प्रमाण ह्याची शिकवण येथे दिसून येते. जेव्हा साई नाथांनी कोप धारण केला तेव्हा तो घाबरला म्हणजे त्याला आपल्यातील उणीव काय आहे ह्याची जाण होती आणि ती उणीव होती जो आपल्या गुरूचा सदगुरु आहे त्यास आपण आपला पूर्ण विश्वास अर्पण करू शकलेलो नाही. आणि भक्ती मार्गात म्हत्वाचे काय तर एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा आणि जेव्हा ही गोष्ट मेघा कडून साध्य झाली तेव्हा तो साई नाथांचा परम भक्त बनू शकला. ही त्याची भक्ती पराकोटीला पोहोचली जेव्हा त्याने साई आणि शिव स्वरूप ह्याचे अभिन्नत्व मान्य करून श्री साई नाथाना स्नान घालण्यास परवानगी मागितली. येथे त्याच्या मनातील “का?” हे प्रश्न चिन्ह कायमचे संपले. कालच प.पू. बापुंनी ह्या “का” बद्दल सांगितले कि कोणता का विचारायचा आणि कोणता नाही विचारायचा आणि कोणता “का” मनातसुद्धा नाही आणायचा. ह्या तीनही पातळीवर मेघा येथे उत्तीर्ण होतो. जेव्हा प्रश्न आणि उत्तर ह्यातील भेदच संपून जातो तेव्हा भक्ती करण्यासाठी शरीराची गरजच उरत नाही आणि मेघाच्या मृत्यू नंतरसुद्धा तो निरंतर साई भक्तीत रममाण होवून जातो.