Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Shivaratri.

#824

Sangita Vartak
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Shivaratri.

हरि ॐ दादा,
आम्ही सर्व जण आतुरतेने वाट बघत होतो तो फोरेम तुम्ही सुरू केला… काल श्रावणातील शिवरात्री (Shivaratri)होती आणि त्याच दिवशी तुम्ही फोरमवर पहिला विषय शिवाचाच दिलात……खूप खूप श्रीराम त्याबद्दल…. आम्हा सर्वांना या फोरमचा फारच उपयोग होणार आहे आणि आम्ही तो नक्की करून घेऊच…. पण फोरम सुरू व्हायची वाट बघताना तो आल्यावर त्यावर कसे आणि काय पोस्ट करायचे याचा विचारच केला नव्हता… काय टाकावे यातच खूप वेळ झाला…. शेवटी म्हटले काही तरी नक्कीच टाकले पाहीजे…. म्हणून ठरविले आणि सुरु केले…. साईचरित्रात शिवाचा उल्लेख झाला……
एकाचे नाव घ्यावे आणि आपसुकच दुसरे नाव यावे तसे मला तरी साईचरित्रातील शिव म्हटले म्हणजे शिवाचा कट्टर भक्त मेघा याचेच नाव आले.
आणखी एक कथा आठवली ती म्हणजे त्रिपुंडाची कथा ज्यात….
दादांसमवेत पंडित गेले। दादांनी बाबांचे पूजन केलें मग दादा बाबांचे पुजेस निघाले। येतां का विचारिलें तयांसी॥५२॥ दादांसमवेत पंडित गेले। दादांनी बाबांचे पूजन केलें। कोणीही न तोंवर लावाया धजलें। गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥ कोणी कसाही येवो भक्त। कपाळीं गंध लावू न देत। मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत। इतर ते लावीत पायांतें॥५४॥ परी हे पंडित भोळे भाविक। दादाची तबकडी केली हस्तक। धरूनिया श्रीसाईंचे मस्तक। रेखिला सुरेख त्रिपुंड॥५५॥ – साईचरित्र अध्याय – ११
या कथेत पंडीत बाबांना त्रिपुंड काढतात आणि त्रिपुंड हे शिवाचे नाम आहे इतकेच मला महित आहे आणखी कोणी मला याबद्द्ल माहीती देऊ शकाल तर कृपया द्यावी…..
हरि ॐ…..