Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Shirdi.

#829

Yogesh Joshi
Member

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Shirdi.

हरी ओम
३१ व्या अध्याव्यातिरिक्त अजून काही संदर्भ आठवतात ह्या अनुषंगाने ते म्हणजे शामाच्या सर्प दंश कथेमध्ये विरोबाच्या देवळाचा उल्लेख येतो. हे विरोबाचे देवूळ म्हणजेच शिर्डीतील(Shirdi) ग्रामदैवत श्री शंकराचे स्थान. त्याच प्रमाणे श्री साई नाथांचे साई असे जे नामकरण झाले ते खंडोबाचे ठिकाण म्हणजेसुद्धा श्री शंकराचेच स्थान. तसेच पोथीमध्ये श्री हेमाडपंत उल्लेख करतात –
दोन हाथ एक माथा
स्थैर्य श्रद्धा अनन्यता
न लागे दुजे साई नाथा
एक कृतज्ञता ते व्हावी
ह्या ओवीतून हेमाडपंत बिल्व पत्राचा उल्लेख करतात जे देवास प्रिय असते आणि
आपल्याला अर्पण करायचे असते श्री वाळुकेश्वर आणि त्रिविक्रमास .

ह्याशिवाय ११वा अध्याय म्हणजे तर साक्षात रुद्राध्याय —
हेमाडपंत म्हणतात — घडेल येणे सगुण ध्यान | हे एकादश रुद्रावर्तन | पंच भूतांवर सत्ता प्रमाण | बाबांचे महिमान कळेल ||
..श्री राम