Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Saptashrungi Nashik,Vani.

#847

Suneeta Karande
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Saptashrungi Nashik,Vani.

हरि ओम. ३० व्या अध्यायांत नाशिक येथील वणीच्या सप्तशृंगीच्या (Saptashrungi – Nashik,Vani) मंदिरातील काकाजी नामक उपाध्यबुवा उर्फ पुरोहितांची गोष्ट आपण वाचतो. त्यात मनाची चंचलता शमविण्यासाठी, दुश्र्चित्तता घालविण्यासाठी सप्तशृंगी देवी काकाजींना बाबांकडे जाण्यासाठी स्वप्नात दृष्टांत देते. परंतु, काक, स्वबुद्धीने त्र्यंबकेश्वरी जातात. अर्थात, त्र्यंबकेश्वरी जाउनही काकांना मनोल्लास लाभत नाही, ना त्यांना मनाला शांती लाभत, ना चित्ताची चंचलता जात. वास्तविक पहाता, त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक आणि जेथे ब्रह्मा, विष्णु, महेश एकत्रित रुपाने विलसतात. मग असे का बरे होते? मला वाटते की ज्योतिर्लिंग असले तरी ते निर्गुण-निराकाराचे प्रतिकच ! वणीची आई हे मोठ्ठ्या आईचे रूपच , ते भक्ती मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी काकाजींना पाठवु इच्छिते शिरडीचे साईबाबा ह्यांच्याकडे म्हणजेच नित्य शिव रुपाकडे – आपल्याच परमात्मा ह्या कनिष्ठ पुत्राकडे – सगुण -साकारा कडे ! कारण आम्हां माणसांसाठी तोच शांतिदाता आहे, बनु शकतो. म्हणुनच, हेमाडपंत ११व्या अध्यायांत आधीच हे सगुण – साकाराच्या भक्तीचे मर्म उलगडुन दावितात-
पूजक जेथवर साकारु । देहधारीच आवश्यक गुरु ।निराकारास निराकारु । हा निर्धार शास्त्राचा ।।१० ।।
न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना । आणि सप्रेम जंव भक्ति घडेना । कळी उमलेना मनाची ।।११ ।।
मला वाटते की काकाजी जरी परमशिव स्वरुपाची आराधना , पूजाअर्चा रोज करीत होते तरी भक्ति मार्ग सुकर बनविण्यासाठी आवश्यक सदगुरुंचा परिस स्पर्श त्यांच्या जीवनाला झाला नव्हता आणि म्हणुनच ते साधण्यासाठीच साईनाथांकडेच त्यांना जावे लागते.
आपण हाच खेळ संत नामदेवांच्या आयुष्यातही पाहतो की साक्षात परब्रम्ह विठ्ठल त्यांच्याशी बोलयचे, त्यांच्याकडुन नैवेद्य भरवुन घ्यायचे तरीही संत मुक्ताई त्यांना कच्चे मडके म्हणते म्हणजेच सगुण साकार सदगुरु हाच मानवाचा समग्र जीवनविकास घडवु शकतो. हा परिस स्पर्श बापू कृपेने आपल्या जीवनी झाला आहे आणि समिर दादा ह्याची जाणिव आपल्याला सदैव करवुन देतात कि ह्याचे सदोदित, सदैव भान ठेवा कि एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू ऐसा .
श्रीराम .
सुनीतावीरा करंडे