Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Ramdas.

#826

Sailee Paralkar
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Ramdas.

शिवलिंगाची अजून एक कथा हेमाडपंतानी सांगितली आहे. एके दिवशी मशिदीत(Masjid) रामदास (Ramdas) नावाचे भक्त बाबांना शिवलिंग अर्पण करतात. ते शिवलिंग बाबा मेघाला देतात. मेघा अत्यानंदित होऊन ते शिवलिंग घेऊन काकासाहेब दिक्षित यांच्या वाड्याकडे निघतो आणि इकडे दिक्षित नुकतेच स्नान आटोपून साईनाथांचे स्मरण करीत बसलेले असतात. स्मरण करीत असताना त्यांना अचानक शिवलिंगाचे दर्शन घडते. त्यांना अतिशय आश्चर्य वाटते कि आज अचानक कसे काय दर्शन झाले ? एवढ्यात मेघा आनंदाने दिक्षित यांच्याकडे पोचतो व त्यांना बाबांनी त्याला दिलेले शिवलिंग दाखवतो. ते पाहून दिक्षित अतिशय उल्हासित होतात कारण ज्या शिवलिंगाचे दर्शन काकांना घडते अगदी तसेच्या तसेच शिवलिंग मेघा बाबांना दाखवतो.