Reply To: The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Makar Sankranti.

#845

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Makar Sankranti.

हरि ओम समीरदादा ,
हा फोरम सुरु केल्याबद्दल खूप खूप श्रीराम.
पंचशील परीक्षेच्या माध्यमातून बापूंनी आम्हाला साईसत्चारीत्राची गोडी लावली.आणि हा आपण सुरु केलेला फोरम
म्हणजे दुधात साखरच जणू!
शंकरची भावी साईनाथ | तोचि उमानाथ तयाचा |
मकर संक्रांति (Makar Sankranti) च्या दिवशी मेघाने साईशंकराला भक्तिरूपी गंगा स्नान घातलं आणि हा भोला शंकर त्याला प्रसन्न
झाला .
डॉक्टर पंडितांनी साई शिवाच्या भाळी त्रीपुंद्रू रेखाटल आणि त्यांच्या मनीचा भाव जाणून साईनाथांनी ते प्रेमानी
स्वीकारलं .
म्हाळसापती खंडोबाचा म्हणजे शिवाचाच भक्त असल्याने त्याने साईशिवाला ओळखले आणि पाहता क्षणीच ‘ आओ साई ‘
म्हणून स्वागत केले .
या श्रेष्ठ भक्तांनी भाव-भक्तीच्या दोन नाण्यांनी सदगुरु साई शिवाला आपलंसं केलं .
‘शं’ करोति इति शंकरः |
कल्याण करतो तो शंकर .
‘शिव’ मधला ‘ इ ‘ हा गतीचा कारक आहे.अनिरुद्ध गतीने हा अनिरुद्ध शिव आपल्या लेकरांसाठी,त्यांच्या रक्षणासाठी
धावत येतो.याचा अनुभव आपण पावलो-पावली घेतच असतो.
‘अनिरुद्ध रंगी रंगून जाणे’ या सारखे भाग्य आम्हाला बापू-कृपेने मिळाले हे आमचे सौभाग्य……….
श्रीराम…….