Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Frog story.

#844

Yogesh Joshi
Member

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Frog story

अध्याय ४७ – सर्प बेडूक कथा

तेथे एक महादेवाचे | मोडके देवूळ कधी काळाचे ||
तयाचिया जीर्णोद्धाराचे | आले सर्वांचे मनात || ७६ ||
————————————————————–
ह्या कथेचे महत्व म्हणजे हे सर्व बोल बाबांच्या मुखातील आहेत , साई नाथ स्वत: ही कथा सांगताहेत आणि सदर कथेत श्री शंकराच्या देवळाच्या उल्लेखासह त्यासंबधी तेथील गुरव , मूळ जमीन मालक व इतरांच्या मनाचे कांगोरे उलगडून दाखवताना वैर – हत्या – ऋण कधी संपत नाही हे दिसून येते.
त्याच बरोबर ह्या ३ गोष्टींची इतिश्री करण्यासाठी सदगुरुची मध्यस्थी आवश्यक असते हे सुद्धा कळून येते.

ह्या शिवाय हेमाडपंत ४थ्या अध्यायात शिर्डीचे महत्व सांगताना म्हणतात –

शिर्डीच आम्हा पंढरपूर | शिर्डीच जगन्नाथ द्वारकानगर ||
शिर्डेच गया कशी विश्वेशर | रामेश्वरही शिर्डीच || ५९ ||
शिर्डीच आम्हा बद्री केदार | शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर |
शिर्डीच उज्जयनी महाकालेश्वर | शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण || ६० ||

ह्यामध्ये साईनाथांचे हरी हर हे एकत्रित स्वरूप म्हणजेच पूर्ण सदगुरू तत्व स्पष्ट होते.