Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva-forum.

#815

Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva-forum.

श्रीराम दादा…फोरमची(Forum) अशी दमदार सुरुवात करण्यासाठी…फोरमचा विषय हा अत्यंत सुंदर आहे. साई सच्चरित्रातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व. हा विषय दिल्याबरोबरच मला मेघाची कथा आठवली.

मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।।
करीं मेघा अहर्निश । साईशंकर- नामघोष । बुद्धिही तदाकार अशेष । चित्त किल्मिष्विरहित ।। १४८।।
मेघा हा कट्टर शिवभक्त होता आणि तो साईपदी देखील तितकाच स्थिर होता. आणि हे त्याच्या साईशंकर (Saishankar) अखंड चालणार्‍या जपावरुन दिसून येते.