Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#838

Sailee Paralkar
Keymaster

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरि ओम दादा, हा फोरम, आमच्यासाठी पुन्हा एकदा साईसत्‌चरितातील गोष्टींचा नव्याने अर्थ उलगडून दाखवणार आहे, यात शंकाच नाही. प. पू. बापूंनी सांगितल्याप्रमाणेच, जितक्या वेळा यातील गोष्टी वाचल्या जातील, त्या प्रत्येक वेळेस नवीन अर्थ उलगडला जाईल. आणि यातून आम्हालाच पुन्हा पुन्हा आनंद मिळणार आहे. श्रीराम….

मेघाच्या कथांमधून बाबांनी शंकराचे महात्म्य दाखवून दिले आहे. बाबा आणि शंकर वेगळे नाहीत हे भक्तांच्या मनावर ठसविले आहे. त्रिशूळ काढायला सांगणे किंवा मेघा बाबांनी दिलेला त्रिशूळ घेऊन काकासाहेब दिक्षितांना दाखवायला घेऊन येतो, पण याआधीच बाबांनी काकांना त्याच शिवलिंगाचे दर्शन दिलेले असते, यावरुन बाबांची म्हणजेच सद्‌गुरुंची सर्वव्यापकता ठळकपणे जाणवते.