Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#839

Ajitsinh Padhye
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरि ॐ दादा. हा फोरमचा उपक्रम सुरू करून तुम्ही आम्हा सर्वांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. श्रीसाईसच्चरिताबद्दल परमपूज्य सदगुरू बापू नेहमीच भरभरून बोलत असतात. दर गुरुवारी बापूंचे हिंदी प्रवचन हे श्रीसाईसच्चरितावरच आधारित असतं. शिवाय श्रीसाईसच्चरिताच्या ११व्या, २२व्या आणि ३३व्या अध्यायाची परमपूज्य सुचितदादांच्या आवाजातील ध्वनीफितही संस्थेने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. साक्षात परमपूज्य नंडाईंनी ’ॐ साई श्रीसाई जय जय साईराम’ ही आरती लिहीली आहे आणि ती दर गुरुवारी हिंदी प्रवचनानंतर घेतली जाते. ह्या व्यतिरिक्त दर गुरुवारी उपासनेला घेतला जाणारा ’ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:’ हा जप, पंचशील परीक्षा, इ. अनेक उदाहरणांवरून दिसून येते की श्रीसाईनाथ आणि श्रीसाईसच्चरित्र हे सर्व श्रद्धावान बापू भक्तांच्या भक्तीमार्गावरील आधारस्तंभ आहेत…आणि म्हणूनच हा फोरम सर्वदृष्ट्या श्रद्धावानांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पहिला विषय बघितल्यावर मला श्रीसाईसच्चरितातील शिवभक्त मेघाची एक गोष्ट आठवते. एकदा मकरसंक्रांतीच्या दिवशी मेघाला साईनाथांना गोदावरीच्या पाण्याने स्नान घालण्याची इच्छा होते. सुरुवातीला ह्यास राजी न होणारे साईनाथ मेघाची अढळ भक्ती व त्याने अतिशय तळमळीने आणि कष्टाने आणलेले गोदावरीचे पाणी पाहता त्यास संमती देतात. पण साईनाथ त्याला विनंती करतात की “मला फक्त माझ्या शिरावर थोडे पाणी घाल. माझ्या शिरावर ओतलेले पाणी हे पूर्ण स्नान घातल्यासमानच आहे.” पण बाबास स्नान घालण्यास अतिशय उत्सुक असणारा मेघा बाबांचे शब्द विसरतो आणि उत्साहाच्या भरात अख्खी घागर बाबांच्या अंगावर पालथी घालतो. हे केल्यावर मात्र त्याच्या लक्षात येते की पूर्ण घागर पालथी करूनही बाबांचे फक्त शिरच तेवढे ओले झाले आहे आणि बाकी सर्व अवयव सुके ठाक आहेत. मेघाला बाबांची खूण पटते. इथे हेमाडपंतांनी लिहीलेली एक ओवी ही सर्वसमर्पक आहे, ’तुझ्या मनीं घालावें स्नान। जा घाल तुझ्या इच्छेसमान। त्यांतही माझ्या अंतरींची खूण। सहज जाण लाधसील॥’ हे सदगुरुतत्व असंच असतं. श्रद्धावानांची भोळीभाबडी इच्छा पुरविताना सुद्धा “त्याच्या (सदगुरुच्या) इच्छेनेच” सर्व गोष्टी घडतात ही गोम पटवून देतं. श्रीराम.