Reply To-The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#849

Vishakha Joshi
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

।। हरि: ॐ।।

पूज्य समीरदादा, ह्या फोरमच्या निमित्ताने आपण आम्हा श्रद्धावानांना श्रीसाईसच्चरिताचा पुन्हा एकदा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करायची संधी दिल्याबद्दल आपले आभार.
’साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व’ असा ह्या फोरमचा पहिला विषय आहे. सगळ्यात आधी इथे आठवण होते, ती श्रीसाईसच्चरितातल्या 11व्या अध्यायाची- श्रीसाईमहिमावर्णन नावाचा हा अध्याय “रुद्राध्याय’ म्हणून ओळखला जातो.
“शिव’ ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिव- शुभ, मांगलिक, सौभाग्यशाली (संदर्भ- संस्कृत-हिन्दी कोश- वा. शि. आपटे). इथे शिव शब्दाचा आणखी एक अर्थ प्रकर्षाने आठवतो, जो परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी म्हणजेच बापूंनी अनेक वेळा प्रवचनांमधून सांगितलेला आहे- “शिवं ज्ञानोपदेष्टारं’.
“ज्ञानोपदेष्टारं’ म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा. जो ज्ञानाचा उपदेश करतो, तो अज्ञानाचा निरास म्हणजे नाश करतोच हे वेगळं सांगायलाच नको. सद्‌गुरु परमात्मा साईनाथ “दिग्दर्शक गुरु’ आहेत. दिग्दर्शक म्हणजे उचित दिशा दाखविणारे आणि उचित दिशा फक्त तोच दाखवू शकतो, जो अज्ञानाचा नाश करतो आणि ज्ञान देतो.
।।हरि: ॐ ।।