Reply To: The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#850

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

साईसच्चरित्रातील शिवाचे संदर्भ, शिवाच्या गोष्टी आणि त्याचे महत्त्व हा विषय देऊन फोरमला सुरवात केली आणि खरच सगळ्यांनीच या डिस्कशनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शिवाचे अनेक संदर्भ प्रत्येकाने दिले. मेघा हा प्रखर शिवभक्त आहे व त्याच्याकरिता साईनाथ शिवस्वरुप आहेत.

शिव हा लय करणारा आहे आणि अकराव्या अध्यायामध्ये आपण साईनाथांचा क्रोध भक्तांच्या कु प्रारब्धाचा लय करताना आपण बघतो. विशाखावीरा जोशी, महेश नाईक यांनी अकराव्या अध्याय “रुद्र अध्याय” असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर योगेश जोशी यांनी नमूद केलेली अध्याय ४७ मधली सर्प-बेडूक यांची पुनरजन्माची कथा.. यातही शिव आहे. सदर कथेमध्ये शिवाचा उल्लेख दोन तीन ओव्यांमध्ये नाही तर संपूर्ण कथा ही शिव आणि शिवाचे कार्य – लय करण्याचे कार्य यावर फिरते. श्रद्धावानाचे ऋण-वैर-हत्या यांचा लय करण्यासाठी एका जन्मात दिलेले वचन साई सदगुरु, साई सदाशिव त्या श्रद्धावानाच्या दुसर्‍या जन्मातही पाळतो. मेघाच्या कथे इतकाच स्पष्ट साई-शिवाचा संबंध या कथेत दिसून येतो. इथेच महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संदर्भ येतो.

योगेश जोशी, अनिकेत गुप्ते, हर्षदावीरा कोलते, पुर्वावीरा, सुनीता कारंडे, सुहास डोंगरे, पल्ल्लवी कानडे यांनी खुप छान संदर्भ दिले आहेत. असाच प्रयास पुढे सुरु रहावा.

साईसच्चरितामध्ये मेघाच्या गोष्टी येतात. त्याच्या मनातील संकल्प आणि विकल्प त्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतात.

त्याचा भक्ती मार्गावरचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. ह्या त्याचा प्रवास आपल्याला अनेक गोष्टी शिकवू शकतो. त्याचा मृत्यू ही आपल्याला अनेक गोष्टी शिकवितो. आपल्या ह्या “साई – द गायडींग स्पिरिट” मध्ये मेघा एक निष्ठावान साई भक्त आणि त्याचा भक्तिमार्गावरील प्रवास आता आपण फोरममध्ये डिस्कशनला घेऊया.