Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#819

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरी ॐ दादा,

‘साई – द गाईडिंग स्पिरिट’ हा फोरम म्हणजे सर्व श्रद्धावानांसाठी खरच एक अनमोल भेट आहे . ह्या फोरम द्वारे श्री साई सच्चरित हे विविध मार्गाने समजुन घेण्यास नक्कीच मदत होऊ शकेल .

श्री साई सच्चरितातील शिवाच्या संदर्भातील सर्वप्रथम गोष्ट आठवते ती शंकर भक्त मेघाचीच.
अध्याय २८ – ” मेघा आधींच शंकरभक्त । होतां साईपदी अनुरक्त । शंकरचि भावी साईनाथ । तोच उमानाथ तयाचा।।१४७।। ”
तसेच पहिल्याच अध्यायात हेमाडपंत सांगतात , “साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९!!