Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#835

Aniketsinh Gupte
Participant

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरी ओम,
साई पंथावरून चालण्यासाठी सुरवात करताना सर्वात पहिला अध्याय तो पण कुठला? तर त्या परम शिवाचा(Shiva). ब्रम्हा-विष्णू-महेश(Brahma-Vishnu-Mahesh) ह्या हिंदू संस्क्रीतीतले अत्यंत वंदनीय असे हे तिन्ही देव. ज्यांना ह्या
श्रुष्टी ची रचना करण्याची जबाबदारी देण्यात आली त्यात महेशचे म्हणजेच परम शिवाचे स्थान खूपच म्हत्वाचे.
साई सत्चारित्र (Saisatcharitra) मध्ये परम शिवाचा उल्लेख आपणास मेघा (Megha) च्या कथेतून येते. तसेच हेमाडपंत ह्यांनी अगदी पहिल्याच अध्याय मध्ये नोंद केलीच आहे.
पहिलच ओवी – गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: II १ II तर पुढे ह्याच अध्याय मध्ये
हे साईनाथ (Sainath) स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच II १९ II म्हणजेच सर्व साई भक्तांना साई हेच गणाधीश तर साई हेच शिवाचे हि रूप. असे अनेक उल्लेख
आपल्याला परम शिवाचे ह्या साई सत्चारितामध्ये येतात.

पंचशील परीक्षा सुरवात झाली आणि साई-सत्चारित्र मधील कथा, भक्तांचे अनुभव ह्याचे आपल्या आजच्या आयुष्यातल्या घटनांशी जोडून घेण्याची सुरवात झाली. नाही. ती बापूंनी करून घेतली. जसा मेघा साठी शंकर काय आणि साई काय तर एकाच, तसेच आज आपल्याही आयुष्यात नेमका हेच घडत असते. अगदी आपल्या नकळत सुधा. साधी गोष्ट सांगायची तर आमच्या ऑफिस च्या दरवाझा मध्ये एक सुंदर सुबक श्री गणेशाची मूर्ती आहे. सकाळी कामाला जाताना गणेशा समोर जाताना आपोआप हाथ जोडले जातात आणि नकळतपणे अगदी सहज तोंडातून शब्द बाहेर पडतात – “हरी ओम बापू”. हीच अवस्था साईचरणी लीन झालेल्या प्रत्येक भक्ताची आहे. मग तो मेघा सारखा शंकरचा उपासक असो किवा रामावर अपार प्रेम करणारी ती भजन-मंडळी मधली बाई असो. हीच प्रेमगंगा शिवाच्या जटातून निघून साई च्या चरणी प्रगत झाली आणि अखंड पणे वाहू लागली.

हरी ओम.

मागे उभा मंगेश I पुढे उभा मंगेश II
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे II