Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

#836

The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.

हरी ओम दादा,

श्री साई सत्चारीतातील ज्या ज्या ठिकाणी* बाबांचा क्रोध*(anger of Baba) दिसून येतो , तो जणू साई बाबांचा शिव अवतारच जाणवतो. शिव नेहमीच चुकीच्या गोष्टीना नाही म्हणायला शिकवतो, नाही म्हणायला
लावतो, नाही म्हणायला भाग पाडतो. आणि त्याची सुरवात होते ती अगदी मंगलाचरणा पासून. जिथे साई आणि शिव वेगळे नाहीत हे हेमाडपंत सांगतात. त्याचा बरोबर दळण्याच्या देखाव्यात कॅअरा बायकांवर क्रोध धारण करून गावातील महामारीला वेशी बाहेर काढतात . जणू प्रत्येक भक्ताच्या मनातील वाईट विचारांचा भरडा, अर्थात चुकीच्या गोष्टीना सदैव वेशी बाहेर म्हणजेच आपल्या मना बाहेर टा कून विश्वासाचा खुंटा घट्ट करतो. बाबांची क्रोध धारण करण्याची कृती ही कधी भक्ताची आकृती तयार करण्यासाठी तर कधी प्रारब्धाच्या विल्ख्यातुना त्याला सोडवण्यासाठी होती. साई सत्चारीतातील अकरावा अध्याय तर रुद्र अध्याय आहे. ह्याच अध्यायात डॉक्टर पंदितांची त्रीपुंदाची कथा ही आम्हाला देव भावाचा भुकेला आहे , अशा वेळी रुद्र अवतार धारण करणारा शिव कसा बोल्या भावाला भुलून भोलानाथ होतो ह्याची प्रचिती येते, तर आपल्या लाडक्या भक्ता साठी त्याचे रक्षण करण्यासाठी तो रुद्र अवतार घेतो. मेघा सारख्या शिव भक्ताच्या मनातील विकाल्पाच्या लहरी भस्म करतो, तर दुसर्या क्षणात त्याच्या कडून त्रिशूल काढून घेतात. एकदा तर पुण्याचा रामदास नावाचा भक्त बाबांना शंकराची लिंग अर्पण करतो , तेव्हा बाबा मेघाला ती देतात आणि म्हणतात ,” हा शंकर आला | सांभाळी याजला तू आता| ” . , बाबांनी केलेला प्रत्येक तांडव हा भाक्तातीला अनुचित गोष्टींचा त्याग करायला लावणारा होता. मीना वैनी म्हणतात ,” वैनी म्हणे तांडव नृत्ये दाखवी , हे आपुलीच खुण, असा असे हा माझा देव तांडवात करी तारण. ” पण हे अनुभवण्या करिता भक्त ही हवा तसाच. माधवराव देशपांडे सर्पदंश होऊन देखील , सरल बाबांकडे आले, पण बाबा ते येताच बाबा
त्याना म्हणाले ‘ चढू नकोस भातुर्ध्या वर” , पण माधवराव मात्र तिथेच उभे राहिले. असे असंख्य भक्त ज्यांनी बाबांच्या क्रोधातच आपले हित आहे हे जाणून त्यानी खर्या अर्थानी श्रद्धा आणि सबुरीने साई शंकराला अपेक्षीत असे बिल्वपत्र वाहिले.
दादा ह्या फोरम मुळे साईनाथांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक भक्ताचा खूप खूप हेवा वाटायला लागलाय, ह्या सगळ्यांशी नातं अधिका धिक दृढ करण्याची संधी मिळतीये, दादा खूप खूप श्रीराम.