Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Kedarnath.

Forums Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Kedarnath.

#831

Suneeta Karande
Participant

Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Kedarnath.

हरि ओम. रेशमावीरा, अगदी बरोबर. साई आणि शंकर वेगळे नाहीत हे हेमाडपंत अगदी पहिल्या अध्यायांत ही सांगतात “साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधीक्ष । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९।। माझा साई हाच माझ्यासाठी गणाधीक्ष ,सावित्रीश (ब्रम्हा), रमेश (विष्णु) आणि उमेश (शिव) आहे.
ह्याच विषयाशी निगडीत चर्चेदरम्यान, आशावीरा कुळ्कर्णीनी मला हे ध्यानात आणुन दिले की हेमाडपंत पुढे जाउन स्वत:च्या घराण्यात शिव-भक्तिची बीजे कशी रुजविली गेली होती ते सांगतात की –

आतां वंदूं सदाशिव। पितामह जो पुण्यप्रभाव । बदरीकेदारीं दिला ठाव । संसार वाव मानुनी।।३२।।

पुढे वंदूं निजपिता । सदा सदाशिव आराधिता। कंठी रुद्राक्ष धारण करिता। आराध्यदेवता शिव जया ।।३३।।

हेमाडपंताच्या घरी त्यांचेच आजोबा हे शिवभक्तीत तल्लीन होउन, संसारातुन अलिप्त होउन बदरीकेदारी ठाव देउन होते, एवढेच नव्हे तर हेमाड्पंताचे वडिलांचीही आराध्यदेवता शिवच होती, जे सदा सदाशिवाची आराधना करत आणि गळ्यात, कंठी रुद्राक्षही धारण करीत.

Badarinath Dham is considered as one of the most sacred centres of pilgrimage situated in the lofty Himalayan heights in the Garhwal hill tracks (Uttarakhand).

Lord Shiva manifested in the form of Jyotirlingam or the cosmic light. Kedarnath is highest among the 12 Jyotirlingas. This ancient and magnificient temple is located in the Rudra Himalaya range.
म्हणजेच आजोबांसाठी महाविष्णू आणि परम शिव हे गुरुतत्व एकच होते आणि तीच भक्ती वडिलांकडे प्रवाहित झाली होती.

मेघाच्याच कथेत पुढे बाबा त्याची मकरसंक्रातीच्या दिवशी शंकराला आवडते म्हणुन साईंना गंगोदकाने स्नान घालण्याची इच्छाही पुरवितात, पण त्यात ही स्वत:ची अंतरीची खुण पटवुनच ना – फक्त शिरावरच इवलेंसे जळ घालीं हे साईंचे बोल अमोघ ठरतात, जरी मेघा अत्यानंदाने, प्रेमाने अख्खा कलश

हर गंगे म्हणुन सबंध अंगावर ओततो… किती अगाध लीला आहे ना माझ्या साईमाउलीची !!!