Queen Bijoymalana, a devotee of Mahadurga

#76598

Sailee Paralkar
Keymaster

मला असे वाटते कि बिजॉयमलाना(Bijoymalana) ही सर्वात शूरवीर व धाडसी स्त्री आहे. ती सम्राज्ञी आहे आणि महादुर्गेची (Mahadurga)भक्तही आहे. तसेच अतिशय विनयशील स्त्री आहे. तिने स्वत:च्या भक्तिची जपणूक निंबुरावर पण केली. त्यामुळेच वसुंधरेवरती येऊन सॅथाडॉरिनाच्या शहाला काटशह देऊ शकली. तिने आर्यश्री व तिच्या आई-वडिलांची काळजी घेतलीच पण बेमालूमपणे वेड्याचे नाटक वठवून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. हे करत असताना electric shocks पण सहन केले. स्वत:च्या नवर्‍याशी contact मधे रहिली. सर्व व्रती लोकांना एकत्र आणून त्यांना बांधून ठेवून तिने ड्रुईड लोकांविरुध्द कट रचले आणि एवढे करुन ती स्वत: नामानिराळी राहिली.